राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदी यांच्या आंदोलनजिवी शब्दाला क्रोनीजीवीने प्रत्युत्तर

Rahul Gandhi-PM Modi

नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) राज्यसभेत दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना ‘आंदोलनजीवी’ शब्द वापरला.

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आंदोलनजिवीला प्रत्युत्तर दिले आहे. त्यानंतर अनेकांनी या शब्दाशी साधर्म्य साधणारे पोटशब्द तयार करण्याचा सपाटाच लावला. आता राहुल गांधी यांनीही क्रोनीजीवी शब्द तयार करत पंतप्रधानांवर निशाना साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत बोलताना ‘देशात नवी जमात जन्माला आली आहे. आंदोलनजीवी, ते आंदोलनांवरच जगतात. ते कायम नवे आंदोलन सुरु करण्यासाचे मार्ग शोधत असतात.

देशाने या आंदोलनजीवींपासून सावध राहिले पाहिजे.’ असे म्हणाले होते. त्यावर काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी ट्विट करुन प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की मी एक अभिमानी आंदोलनजीवी आहे आणि सर्वोकृष्ट आंदोलनजीवी हे महात्मा गांधी होते. चिदंबरम यांच्यानंतर राहुल गांधी यांनीही आंदोलनजीवीवर टीका केली. राहुल गांधींनी ‘क्रोनीजीवी म्हणजे जे देश विकायला काढतात’ असे ट्विट केले. त्यांनी केंद्र सरकारच्या सरकारी कंपन्यांचे निगुंतवणुकीकरण करण्याच्या निर्णयावर टीका केली.

ही बातमी पण वाचा : काँग्रेस हा गोंधळलेला पक्ष : नरेंद्र मोदी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER