आदित्य ठाकरेंवर टीका करणाऱ्यांना सुनावले; दात उचकटणाऱ्यांचे दात घशात जातील- संजय राऊत

बिहार निवडणूक लढवण्यासंदर्भात उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार

Sanjay Raut

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकार परिषदेत फडणवीस भेटीवर स्पष्टीकरण दिले. यावेळी त्यांनी बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचा राजकीय प्रवेश, बिहार निवडणूक लढवण्यासंदर्भात शिवसेनेची भूमिका तर, मध्यंतरी सुशांत प्रकरणावरून आदित्य ठाकरेंवर झालेली टीका या सर्व बाबींवर भाष्य केले.

सुशांतसिंह प्रकरण सीबीआय, एनसीबी, ईडी अशी विविध मोठी खाती या प्रकरणाच्या तपासात व्यग्र आहेत. मात्र, अद्यापही सुशांतची आत्महत्या की खून याचा उलगडा झालेला नाही. याबाबत संजय राऊत म्हणाले, आम्ही आता सीबीआयच्या अहवालाची वाट पाहतोय. सुशांतची केस सीबीआयच्या हातात जाऊन महिना होतोय; पण सीबीआयकडून अद्याप ठोस निष्कर्ष आलेला नाही.

सीबीआय या केसमध्ये काय खुलासा करणार याची आम्ही वाट पाहात असल्याचे राऊत म्हणाले. तसेच, या प्रकरणात जो शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांवर आरोप झाला तो तथ्यहीन तर होताच, असे म्हणताना संजय राऊत यांनी आदित्य ठाकरेंचे नाव न घेता दात उचकटणाऱ्यांचे दात घशात जातील, असा शब्दांत टीकाकारांवर निशाणा साधला. दरम्यान, सुशांतच्या प्रकरणात आदित्य ठाकरेंचा समावेश असल्याचा आरोप भाजप नेते राणे पितापुत्राने लावला होता. यावेळी माध्यमांनी राऊत यांना गुप्तेश्वर पांडेंच्या राजकीय प्रवेशाबद्दल विचारले असता, ते म्हणाले, गुप्तेश्वर पांडेंच्या राजकीय प्रवेशावर टीका करणार नाही. पांडेंनी महाराष्ट्र पोलिसांची बदनामी केली त्यावर आक्षेप असल्याचे राऊत यांनी सांगितले.

शिवसेना बिहार निवडणूक लढवणार का ?

संजय राऊत म्हणाले, बिहारमध्ये निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. बिहार निवडणूक लढवण्यासंदर्भात उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER