मोदींवर टीका करणारे तोंडघशी; लसीच्या साठ्यावरून सीरमने दिले स्पष्टीकरण

PM Narendra Modi - Adar Poonawalla

नवी दिल्ली : आमच्याकडे लसीचा एवढा स्टॉक नाहीये हे केंद्र सरकारला (Central Government) माहीत होतं. तरीही केंद्र सरकारने ४५ वर्षांवरील आणि नंतर १८ वर्षांवरील लोकांना लस देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे देशात लसींचा तुटवडा निर्माण झाल्याचे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India) कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानावरून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (PM Narendra Modi) केंद्र सरकारवर टीकेचा भडिमार केला होता. मात्र आता सीरमने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर टीका करणारे तोंडघशी पडले आहेत. जाधव यांच्या वक्तव्याशी कंपनीचा काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे.

सीरम इन्स्टिट्यूटच्या नियामक विभागाचे संचालक प्रकाशकुमार सिंह (Prakash Kumar Singh) यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला २२ मे रोजी पत्र पाठवून हे स्पष्टीकरण दिले आहे. सीरमकडून असे कोणत्याही प्रकारचे विधान केले गेलेले नाही. जाधव यांच्या विधानाशी आमचा संबंध नाही. तसेच जाधव यांनी जे सांगितले तो आमचा विचार नाही. हे स्पष्टीकरण मी सीरमचे सीईओ अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांच्यावतीने करत आहोत, असं सिंह यांनी या पत्रात म्हटलं आहे.

तसेच लसींचे उत्पादन वाढवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तसेच कोरोनाविरोधातील लढाईत आम्ही सरकारच्या सोबत खंभीरपणे उभे आहोत, असे सांगतानाच पूनावाला हेच आमच्या कंपनीचे एकमेव अधिकृत प्रवक्तेही असल्याचे सिंह यांनी पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button