WHO कडून मोदी सरकारचे कौतुक; विरोधक टीका करण्यात व्यस्त

PM Modi

मुंबई : कोरोनाने भारतात हातपाय पसरायला सुरुवात करताच मोदी सरकारने देशभरात लॉकडाउन जाहीर केले. मोदींच्या या निर्णयानंतर कोरोना विषाणूचा संसर्ग थांबवण्यासाठी भारताकडून सुरु असणाऱ्या प्रयत्नांचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) कौतुक केले आहे.

युरोपबरोबर अमेरिकेतील अनेक देशांनी कोरोना ला गांभीर्याने न घेतल्याचे चित्र दिसले तर दुसरीकडे भारताने यासंदर्भात योग्य निर्णय वेळोवेळी घेतल्याचे मत नबारो यांनी व्यक्त केलं आहे. भारत हा उष्ण प्रदेशातील देश आहे तसेच मलेरियामुळे येथील लोकांची रोगप्रतिकारकशक्ती अधिक आहे. त्यामुळेच भारतीय लोक कोरोनाला नक्कीच हरवतील अशी आम्हाला अपेक्षा आहे, असंही नबारो म्हणाले. केंद्र सरकारने कोरनाचा संसर्ग थांबववण्यासाठी घेतलेल्या निर्णयांचे नबारो यांनी कौतुक केल. तसेच लॉकडाउनदरम्यान लोकांना त्रास होत असला तरी कठोर निर्णयांमुळे जेवढा जास्त त्रास होईल तेवढ्या लवकर या संकटापासून भारतीयांची सुटका होईल असे मत नबारो यांनी मांडले .

कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी जागतिक बॅंकेनी दिला ७५०० कोटींचा निधी

दरम्यान आज कोरोना मुळे पसरलेला अंध:कार दूर करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. त्यामुळेच आपण सर्वांनी रविवारी रात्री नऊ वाजता घरातील सगळे लाइट्स बंद करुन घराच्या दारात किंवा बाल्कनीमध्ये एक दिवा, मेणबत्ती, बॅटरी किंवा मोबाईल फ्लॅशलाइट लावावेत,असे आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशातील जनतेशी संवाद साधला.