ओबीसींचं मंत्रालय म्हणजे जातीय भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न – विखे पाटील

vikhe patil
File Image

मुंबई : आज राज्य शासनाने मंजूर केलेल्या ओबीसी मंत्रालयाच्या निर्णया विषयी बोलतांना काँग्रेसचे नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली आहे. राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय म्हणजे फोडा, झोडा आणि राज्य करा, अशा प्रकाराचा असल्याचे म्हटले आहे. जातीय भेदभाव निर्माण करण्यासाठीच सरकारने हा निर्णय घेतला असल्याचा गंभीर आरोप करत सरकारच्या निर्णयाबाबत शंकाही विखे पाटलांनी व्यक्त केली आहे.

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ओबीसी मंत्रालयाला मंजुरी प्रदान करण्यात आली. राज्यात ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात येणार असून त्यासाठी स्वतंत्र पदभार दिला जाणार आहे.

सरकारने ओबीसी समाजाला सक्षम करण्यासाठी निर्णायक भूमिका घेतली आहे. परंतु त्यांनी जातीय भेदभाव निर्माण करण्याचे काम सुरू केले आहे. सरकारने घेतलेला हा निर्णय राजकीय फायद्यासाठी की खरंच ओबीसी समाजाच्या फायद्यासाठी घेतलाय हे येणाऱ्या भविष्यकाळत दिसणार आहे. सरकारची ही फोडा, झोडा नीती असल्याचे त्यांनी म्हटले.