चोहोबाजूंनी टीकेची झोड : प्रसिद्धीसाठी सहा कोटी रुपयांचा निर्णय रद्द

Ajit Pawar

मुंबई :- राज्यावर कोरोनाचे संकट असताना जाहिराती आणि प्रसिद्धीसाठी सोशल मीडियावर सहा कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी घेतला होता; पण चोहीबाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर अखेर अजित पवार यांनी एक पाऊल मागे घेत हा निर्णय मागे घेतला आहे. उपमुख्यमंत्री कार्यालयाचा सोशल मीडिया (Social Media) सांभाळण्यासाठी बाह्ययंत्रणेची कुठलीही गरज नाही. यासंदर्भातील शासन निर्णय तत्काळ रद्द करावा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. उपमुख्यमंत्री कार्यालयाला समाजमाध्यमांवर स्वतंत्रपणे कार्यरत राहण्याची गरज वाटत नाही, असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यमातून शासकीय जनसंपर्काचे काम हाताळले जाणे शक्य असताना उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समाजमाध्यमांची जबाबदारी बाह्ययंत्रणेला देण्याची गरज नाही. सद्य:स्थितीत उपलब्ध जनसंपर्क व्यवस्थेद्वारेच यापुढेही नागरिकांशी, प्रसिद्धी माध्यमांशी संवाद ठेवण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता यासंदर्भातील शासन निर्णय तत्काळ रद्द करण्यात येणार आहे.

ही बातमी पण वाचा : अजित पवारांच्या सोशल मीडियासाठी सरकारी तिजोरीतून ६ कोटींची खैरात !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button