शरद पवारांच्या प्रकृतीवर टीका, भाजपने दिलगिरी व्यक्त करावी, नाहीतर …. : हसन मुश्रीफ

Hasan Mushrif - Maharastra Today
Hasan Mushrif - Maharastra Today

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. एकीकडे पवार (Sharad Pawar) यांच्या प्रकृतीसाठी सर्व स्तरातून प्रार्थना केली जात आहे. मात्र दुसरीकडे पवार (Sharad Pawar) यांच्या प्रकृतीचा निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze Case) प्रकरणाशी संबंध भाजपच्या मीडिया सेल प्रमुखांनी जोडला आहे . यावरून भाजपने दिलगिरी व्यक्त केली नाही, तर फार मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी कोल्हापुरात दिला.

‘भाजपच्या मीडिया सेलचे प्रमुख नवीन कुमार जिंदल (Naveen Kumar Jindal) यांनी शरद पवार यांच्या आजारपणावर केलेली टीका दुर्दैवी आहे. भाजपने दिलीगिरी व्यक्त करुन हे थांबवावं. दोन दिवसात दिलगिरी व्यक्त केली नाही तर फार मोठी किंमत मोजावी लागेल. आम्ही बोलायला लागलो तर त्यांच्या (भाजप नेते) कुठून कुठून कळा येतील बघा” असा इशारा हसन मुश्रीफ यांनी दिला.

दरम्यान भाजपच्या मीडिया सेलचे प्रमुख नवीन कुमार जिंदल यांनी सोमवारी यासंदर्भात ट्विट केले होते. ‘सचिन वाझे यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेला असं काय सांगितलं की, शरद पवार यांच्या पोटात इतक्या जोरात दुखायला लागलं. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. आता तर वाटतं की, ‘दाल में कुछ काला नही, पुरी दालही काली है’ असे नवीन कुमार जिंदल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button