सोशल मीडियावर शरद पवारांवर टीका; नोटीस न देता ताब्यात घेतल्याचा भाजपचा आरोप

Pradeep Gavde - Maharashtra Today

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि त्यांचे नातू आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्याबाबत सोशल मीडियावर टीका करणे भाजपच्या (BJP) पदाधिकाऱ्याला महागात पडले. भाजप युवा मोर्चाचे सचिव प्रदीप गावडे यांना त्यांच्या पुण्यातील घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. बांद्रा सायबर सेल पोलिसांनी प्रदीप गावडे (Pradeep Gavde) यांना सकाळी पुणे येथून ताब्यात घेतलं.

मात्र गावडे यांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता पोलिसांनी कारवाई केल्याचा आरोप भाजपकडून केला गेला आहे. त्यांच्याविरोधात भादंवि कलम २९५ अ, ५०० आणि ५०५/२ कलमांतर्गत तसेच आयटी एक्ट ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, “माझी अटक हे राजकीय षडयंत्र आहे. मोठे लोक यात समाविष्ट आहेत. मला ४२१ ची नोटीस द्यायला हवी होती. पवार कुटुंबीय जर एवढं घाबरत असेल तर त्यांनी गोविंद बागेत गोट्या खेळाव्यात.” अशी खोचक प्रतिक्रिया गावडे यांनी दिली.

प्रदीप गावडे यांनी शुक्रवारी याबाबत आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर प्रतिक्रिया दिली होती. “पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबाबत समाज माध्यमात आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ५४ जणांविरोधात आठ ते दहा दिवसांपूर्वी मी पुणे सायबर पोलिसांकडे तक्रार दिली होती. मी जेव्हा ५४ जणांवर गुन्हा दाखल केला तेव्हा मला माहिती होतं, हेतुपुरस्सर माझ्यावर काही तरी कारवाई करण्यात येईल. मी अशा कोणत्याही कारवाईला घाबरत नाही. मी ५४ जणांवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांवर कोणत्या प्रकारचं प्रेशर आहे ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. ज्या दिवशी गुन्हा दाखल केला त्या दिवशी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माझी तक्रार केली. त्यांनी पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी त्यांनी संबंधित ट्विट डिलिट केलं, असं गावडे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button