‘हे मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे राजकारण प्रतिक’; सचिन सावंत यांची टीका

मुंबई : १०० कोटी वसुलीप्रकरणी आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात आता ईडीनेसुद्धा गुन्हा दाखल केला आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमध्ये आता खळबळ उडाली आहे. “हा मोदी सरकारच्या (Modi Govt) घाणेरड्या मनोवृत्तीचे व लोकशाहीला घातक अशा भयानक राजकारणाचे प्रतिक आहे.” अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी केली.

CBI पाठोपाठ EDने अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल केला. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सचिन सावंत यांनी ट्विटवरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर EDने दाखल केलेला गुन्हा हा मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे व लोकशाहीला घातक अशा भयानक राजकारणाचे प्रतिक आहे. कोरोना हाताळण्यात मोदी सरकारचे अपयश झाकण्यासाठी व जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका सावंत यांनी केली.

“परमबीर सिंह यांच्या खोट्या आरोपांवरून कारवाई केली आहे. आरोपांचे विश्लेषण केले तरी सचिन वाझेने १०० कोटी जमवण्यास सांगितले असे म्हटले. परमबीर सिंह यांनी ही तेच म्हटले. पैसे दिले असे आरोपकर्तेही म्हणत नाही. मग CBI धाडी कशावर टाकत होती? पैसे दिलेच नाही तर ED कशाला? आणि जर पैसे दिले असे CBI व ED चे म्हणणे असेल तर परमबीर सिंह व वाझेवर कारवाई का नाही? हा मोदी सरकारने सुरू केलेला राजकीय छळ आहे हे स्पष्ट आहे. जनता ही आता हे ओळखून आहे. या राष्ट्रीय तपास यंत्रणांची कारवाई म्हणजे जोक झाला आहे, असा टोलाही सावंत यांनी ट्विटवरून लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button