ज्या गुंड प्रवृत्ती आम्ही दाबून टाकल्या होत्या त्या पुन्हा बाहेर आल्या आहेत; पंकजा मुंडेंची टीका

Pankaja Munde on Dhananjay Munde

मुंबई : मी बीड जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून काम केलं. पण धनंजय मुंडे (Dhananjay Munde) परळीपुरतं मर्यादित राहिले. मी राज्याची मंत्री म्हणून काम करताना परळीच्या एखाद्या कामाकडे दुर्लक्ष झालं असावं पण धनंजय मुंडेंचं जिल्ह्यामध्ये वास्तव्य करताना इतर ठिकाणी फारसा वावर दिसत नाही. ज्या गुंड प्रवृत्ती आम्ही दाबून टाकल्या होत्या त्या पुन्हा बाहेर आल्या आहेत, अशी टीका पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केली.

एका वृत्तसमूहाला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या की, धनंजय मुंडेंचं काम पसंत नव्हते, म्हणून मी राजकारणात आले. मी राजकारणात येणार नव्हते. तेव्हाच्या परिस्थितीत असे म्हणत होते की, धनंजय निवडून येणार नाही, पंकजा मुंडेंना उभ करा. मी राजकारणात येण्यासाठी अजिबात इच्छुक नव्हते तेव्हा. आत्ता आले. आता धनंजय मुंडे यांनी चांगलं काम कराव अशा शुभेच्छाही मी त्यांना दिल्या. पण मला नाही वाटत आता जिल्ह्यातले लोक समाधानी आहेत.

धनंजय फक्त परळीपुरतेच मर्यादित

धनंजय मुंडे यांच्या कार्यपद्धतीतील उणिवा सांगताना पंकजा म्हणालात – धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांचा लोकांना त्रास आहे. त्यांच्यावर ते नियंत्रण ठेवत नाहीत अशी चर्चा आहे. मी बीड जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून काम केले. पण धनंजय मुंडे परळीपुरते मर्यादित राहिले. मी राज्याची मंत्री म्हणून काम करताना परळीच्या एखाद्या कामाकडे दुर्लक्ष झालं असावे पण धनंजय मुंडेंचे जिल्ह्यामध्ये वास्तव्य असते इतर ठिकाणी फारसा वावर दिसत नाही. ते जिल्ह्याचे विषय हाताळताना दिसत नाहीत. वाळू माफिया, सिविल सर्जन हे विषय हाताळताना ते दिसत नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांचा सुळसुळाट आहे. त्यावर लोकांची नाराजी आहे. ज्या गुंड प्रवृत्ती आम्ही दाबून टाकल्या होत्या त्या आता पुन्हा बाहेर आल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button