हा तर शिमगा ! उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातल्या भाषणावर चंद्रकांत पाटलांची टीका

Chandrakant Patil-Uddhav Thackeray

नवी दिल्ली :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे दसरा मेळाव्याचे भाषण दसऱ्याचे नसून शिमग्याचे होते. शिमग्याला आपण जसे विरोधकांच्या नावानं बोंब मारतो, तसेच हे भाषण होते. अशी टीका चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली.

उद्धव ठाकरेंच्या भाषणावर विरोधकांनी सडकून टीका केली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हे शोभत नाही. केवळ मुख्यमंत्र्यांचा मास्क काढून मी बोलतोय, असे म्हणून होत नाही. उद्धव ठाकरेंच्या भाषणात, मराठा आरक्षणावर, राज्यातील कोरोना परिस्थितीवर किंवा राज्यातील शिक्षणासंदर्भात काहीही भाष्य नाही. राज्यातील शाळा कधी सुरू होतील, यावरही ते काहीही बोलले नाहीत. शाळा सुरू होण्याबद्दल काहीच माहिती नसल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये सध्या संभ्रम निर्माण झाला आहे, असे पाटील म्हणालेत.

मुख्यमंत्र्यांबद्दल खासदार नारायण राणेंनी एकेरी भाषा वापरून टीका केली; ती भाषा चूक नाही का, या प्रश्नाच्या उत्तरात चंद्रकांत पाटील यांनी प्रश्न केला, मेळाव्यातील भाषणात मुख्यमंत्र्यांनी वापरलेली भाषा योग्य होती का? ज्या भाषेत मुख्यमंत्री बोलले त्याच भाषेत त्यांच्यावर टीका करण्यात आली, असे म्हणून पाटील यांनी नारायण राणेंचे समर्थन केले.

ही बातमी पण वाचा : सरकार कधी पडणार हे उद्धव ठाकरेंना कळणारही नाही, रामदास आठवलेंचा टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER