धनंजय मुंडेंवर बदनामीचे संकट; पंकजा मुंडे गप्प का?

Maharashtrta Today
  • राजकीय मतभेद असले तरी अडचणीत भावाची विचारपूस करणा-या पंकजा मुंडे आता गप्प का? असा प्रश्न विचारला जात आहे.

मुंबई :- राष्ट्रवादीचे (NCP) नेते, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) सध्या अडचणीत सापडले आहे. रेणू शर्मा (Renu Sharma) नावाच्या महिलेने त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर एकच खळबळ उडाली व राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. विरोधी पक्ष भाजप तर अत्यंत आक्रमकपणे मुंडेंचा राजीनामा मागत आहेत. असे असतानाही या सर्व बाबींवर आपले कोणतेही मत, प्रतिक्रिया बहीण व भाजप (BJP) नेत्या पंकडा मुंडे (Pankaja Munde) यांच्याकडून न आल्याने पंकजा मुंडेंचे मौन चर्चेचा विषय ठरला आहे.

धनंजय मुंडे यांना कोरोना झाल्यावर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करणाऱ्या भाजप नेत्या पंकजा मुंडे आता गप्प का आहेत? धनंजय मुंडेंवर बदनामीचं संकट ओढवलेलं असताना पंकजा मुंडे गप्प असल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

या प्रकरणावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya), विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar), आमदार राम कदम (Ram Kadam), आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यासह महिला आघाडीच्या नेत्यांनी या प्रकरणी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. चंद्रकांतदादांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली आहे. भाजपच्या अर्धा डझन नेत्यांनी मुंडेप्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मात्र मुंडे भगिनींनी यावर अद्याप मौन धारण केले आहे. भाजपच्या नेत्या आमदार पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) आणि खासदार पूनम महाजन यांनी काही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. त्यातही पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त न केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

पंकजा मुंडे मुंबईतच
पंकजा मुंडे गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतच आहेत. त्या परळीला गेलेल्या नाहीत. गेल्या आठवड्यात त्या परळीत होत्या. तिथे त्यांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा आढावा घेतला. त्यानंतर त्या मुंबईत आल्याचं सूत्रांनी सांगितलं असल्याचं वृत्त टीव्ही-९ नं दिलं आहे.

पंकजा मुंडे मौन का? जाणकार सांगतात –
कौटुंबिक प्रश्न असल्याने जाहीर प्रतिक्रिया देणं योग्य नाही. शिवाय ही खासगी बाब आहे. तसेच या प्रकरणात रोज नवनव्या घडामोडी घडत आहेत. हे प्रकरण हनी ट्रॅपचं असल्यासारखं दिसत आहे, त्यामुळे चित्रं स्पष्ट झाल्यावरच त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य ठरेल म्हणूनही त्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं असावं, असं जाणकार सांगतात.

तसेच, भाजप नेत्यांनी मुंडे प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. राष्ट्रवादीकडूनही कालपेक्षा आज वेगळी भूमिका घेतली आहे. त्यामुळेही पंकजा मुंडे वेट अँड वॉचच्या भूमिकेत असाव्यात असंही सांगितलं जात आहे.

ही बातमी पण वाचा : मुंडेंवर आरोप करणा-या महिलेने आतापर्यंत चार मोठ्या पदाच्या लोकांना ब्लॅकमेल केले ? पोलिसात चौथी तक्रार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER