करण जोहरच्या कंपनीसमोर विश्वासार्हतेचे संकट; ‘ब्रह्मास्त्र’ला थेट ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा प्रस्ताव

Karan Johar

निर्मातानिर्माता करण जोहरचा (Karan Johar) चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) जो तीन भागांत बनल्यामुळे अनेक महिन्यांपासून चर्चेत होता. आता रिलीज होण्याच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. वर्ष २०२० मध्ये करण जोहरची कंपनी धर्मा प्रॉडक्शन्सच्या ब्रँडिंगचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचा परिणाम म्हणून हा चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित होण्याची चर्चा सुरू झाली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत मोठ्या बजेटचे चित्रपट बनवणाऱ्या फॉक्स स्टार स्टुडिओची मालकी जेव्हा डिस्नेवर आली आहे तेव्हापासूनच या कंपनीचे सर्व दुष्कर्म एक-एक करून समोर आले आहेत.

अंतर्गत तपासणीत हे स्पष्ट झाले आहे की, कंपनीने आपले बजेट मनमानी खर्च केले आणि ज्या प्रोजेक्ट्सवर हा पैसा खर्च झाला ते अतिशयोक्तिपूर्ण होते. डिस्ने व्यवस्थापनाची सध्याची चिंता म्हणजे ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट. काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीत अशी चर्चा रंगली होती की, ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट ‘लूटकेस’, ‘लक्ष्मी’, ‘सडक २’ इत्यादी फॉक्स स्टार चित्रपटांप्रमाणेच डिस्ने प्लस हॉटस्टारच्या मार्गावर जाऊ शकतो. चित्रपटाची निर्मिती कंपनी आता ह्या चित्रपटाला चित्रपटगृहात नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा विचार करत आहे. मात्र, असे झाल्यास करण जोहरची कंपनी धर्मा प्रॉडक्शन्सच्या ब्रॅंडिंगला मोठा धक्का बसणार आहे.

करण जोहरचा दुसरा चित्रपट ‘ड्राईव्ह’मुळे त्याची प्रतिष्ठा बरीच कमी झाली. हा सिनेमा नेटफ्लिक्सला विकल्यानंतर या चित्रपटाचा अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मानसिक स्थिती बिघडली होती. त्याचबरोबरअक्षयकुमारच्या ‘लक्ष्मी’ चित्रपटाला डिजिटल प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद न मिळाल्यामुळे डिस्ने इंडियामध्ये निराशेचे वातावरण आहे. डिस्ने प्लस हॉटस्टार या चित्रपटाच्या ग्राहकांना एकत्रित करण्याच्या प्रक्रियेत होता; परंतु विद्यमान ग्राहकांवर हा चित्रपट हावी झाला. ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा प्रस्ताव कागदावर आला आहे.

आता ते वादात आहेत. मात्र, या चित्रपटाचा सहनिर्माता करण जोहरने या प्रस्तावाला सहमती दर्शविली नसल्यामुळे चर्चा फारशी सुरू झाली नाही. फॉक्स स्टार स्टुडिओचे व्यवस्थापन सध्या याबद्दल काहीही बोलण्यास तयार नाही. याबाबत हॉटस्टारच्या प्रवक्त्यांशी बोलले तेव्हा त्यांना अशा कोणत्याही प्रस्तावाची माहिती नसल्याचे सांगितले. त्याचबरोबर, धर्मा प्रॉडक्शनदेखील याबद्दल पूर्णपणे मूक आहे. ‘ब्रह्मास्त्र’ हा रणबीर कपूर, अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, नागार्जुन अक्किनेनी आणि मौनी रॉय मुख्य भूमिका असणारा सुपरहिरो चित्रपट आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER