गुन्हेगाराचा शेवट झाला पण गुन्ह्यांना संरक्षण देणाऱ्यांचे काय?: प्रियंका गांधी

Priyanka Gandhi - Vikas Dubey

नवी दिल्ली : पोलिसांना मारणारा कुख्यात गँगस्टर विकास दुबेला आज सकाळी उत्तर प्रदेश पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केलं. या एनकाउंटरने अनेक प्रश्न मागे सोडले आहेत. या एन्काउंटरविषयी राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया येत आहेत.

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी एक प्रश्न उपस्थित केला आहे. गुन्हेगाराचा शेवट झाला पण गुन्हे आणि त्यांना संरक्षण देणाऱ्याचे काय? असे त्यांनी ट्विटमधून विचारले आहे.

प्रियंका गांधी या उत्तर प्रदेशची धूरा सांभाळतात. त्यांनी काल विकास दुबेला मध्य प्रदेशच्या उज्जैनमधून अटक झाल्यानंतर त्यांनी योगी सरकारवर टिका करणारे टि्वट केले होते. “कानपूर हत्याकांडमध्ये उत्तर प्रदेश सरकारने प्रचंड अलर्ट राहून काम करणे अपेक्षित होते. पण ते अपयशी ठरले. अलर्ट असूनही आरोपी उज्जैनपर्यंत पोहोचला” असे प्रियंका गांधी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले होते.

कुख्यात गँगस्टर विकास दुबेचा आज सकाळी उत्तर प्रदेश पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये खात्मा केला. आठवडयाभरापासून फरार असलेल्या विकास दुबेला काल मध्य प्रदेशच्या उज्जैन शहरात अटक करण्यात आली होती. त्याला उत्तर प्रदेश एसटीएफचे पथक आज कानपूरला घेऊन येत असताना ताफ्यातील एक वाहन पलटी झाले. त्यानंतर विकास दुबे पोलिसाचे शस्त्र हिसकावून पळण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी प्रत्युत्तरादाखल यूपी एसटीएफने केलेल्या कारवाईत विकास दुबे ठार झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER