भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांवर ट्वीटवरून नोंदविलेले गुन्हे रद्द

Tejinder Pal Singh Bagga-Sambit Patra

बिलासपूर :- काँग्रेस पक्ष आाणि त्यांच्या काही नेत्यांसंबंधी ट्वीटरवर केलेल्या भाष्यांवरून डॉ. संबित पात्रा (Dr. Sambit Patra) आणि तेजिंदर पाल सिंग बग्गा (Tejinder Pal Singh Bagga) या भारतीय जनता पार्टीच्या दोन राष्ट्रीय प्रवक्त्यांविरुद्ध छत्तीसगढमधील दोन पोलीस ठाण्यांमध्ये गेल्या वर्षी नोंदविण्यात आलेले एकूण तीन गुन्हे तेथील उच्च न्यायालयाने (High Court) केले.

कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी लागू केलेला राष्ट्रीय ‘लॉकडाऊन’ योग्य प्रकारे हाताळण्यात केंद्र सरकारला अपयश आल्याची टीका छत्तीसगढ काँग्रेसच्या नेत्यांनी  केली होती व काँग्रेस सत्तेत असती तर देशाची स्थिती कितीतरी चांगली असती, असा दावा केला होता.

याला प्रत्युत्तर देताना डॉ. पात्रा यांनी असे उपरोधिक  ट्वीट केले होते: अगर कोरोना व्हायरस काँग्रेस सरकार के वक्त आया होता तो- पाच हजार करोड का मास्क घोटाला, सात हजार करोड का कोरोना टेस्ट किट घोटाला,  २० हजार करोड का जवाहर सॅनिटायजर घोटाला और २६ हजार करोड का राजीव गांधी व्हायरस रीसर्च घोटाला हुआ होता.’

या टष्ट्वीटवरून दिल्लीत काँग्रसवाल्यानी पोलिसांकडे फिर्याद नोंदविल्यावर डॉ. पात्रा यांनी दुसरे ट्वीट केले होते: नेहरू और राजीव को भ्रष्ट कहने पें काँग्रेसियोंने कम्प्लेन किया है. लेकिन अभी तो उनका और भी जलील होना बाकी है:  नेहरु ते तो काश्मीर समस्या को जन्म दिया. न होते नेहरु, न होती कश्मीर समस्या. राजीव गांधी तो बोफोर्स की चोरी की और ३,००० सिखों का कत्ल भी कराया. जाओ और कम्प्लेन करो.‘

डॉ. पात्रा यांच्या या दुसर्‍या  ट्वीटला पुष्टी देत बग्गा यांनी स्वत:  ट्वीट करून अशी दुरुस्ती केली होती की,  राजीव गांधींनी ३,००० शिखांची हत्या केली या संबित पात्रा यांच्या म्हणण्याशी सहमत नाही. पात्रा त्यांनी सांगितला तो केवळ शिखांच्या हत्येचा अधिकृत आकडा आहे. अनधिकृत आकडा पाच हजारांहून जास्त आहे. राजीव गांधी खुनी आहेत.’
या टष्ट्वीटवरून डॉ. पात्रा यांच्याविरुद्ध रायपूर येथे दोन तर बग्गा यांच्याविरुद्ध कांकेर जिल्ह्यात भानुप्रतापपूर येथे एक फिर्याद दाखल झाली. दोन्ही ठिकाणी पोलिसांनी भाजपाच्या दोन्ही प्रवक्त्यांविरुद्ध बदनामी, समाजाच्या दोन वर्गांमध्ये तेढ निर्माण करणे, धार्मिक भावना दुखावणे, धार्मिक तणावास प्रोत्साहन देणे यासह अन्य गुन्हे नोंदविले आणि दोघांनाही चौकशीसाठी पाचारण करणाºया नोटिसा जारी केल्या.

डॉ. पात्रा व बग्गा यांनी याविरुद्ध छत्तीसगढ उच्च न्यायालयात याचिका केल्या. न्या. संजय के. अगरवाल यांनी या याचिकांवर सविस्तर सुनावणी घेतल्यानंतर पात्रा व बग्गा यांच्यावर नोंदविलेले तिन्ही गुन्हे रद्द करण्याचा आदेश दिला.
न्यायालयाने म्हटले की, या  ट्वीटवरून संबंधित गुन्ह्यांचे घटक स्पष्ट होत नाहीत. दोघांनीही आपापली मते मांडली आहेत. त्यांचे म्हणणे तंतोतंत वास्तवाला धरून नसले तरी त्यांचा हेतू तणाव निर्माण करण्याचा नाही. शिवाय येथे दोन समाजवर्गांचा उल्लेख नसल्याने त्यांच्यात तेढ निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही. बदनामीच्या गुन्ह्याबद्दल न्यायालयाने म्हटले की, नेहरू व राजीव गांधी यांची बदनामी झाली असे वाटत असेल तर त्यांचे कुटुंबिय त्याबद्दल तक्रार करू शकतात. त्यांच्या बदनामीची तक्रार अन्य कोणी त्रयस्थ करू शकत नाही.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button