आक्षपार्ह ट्वीटवरून कंगना राणावतविरुद्ध नोंदला गुन्हा

Kangana Ranaut

तुमकूर (कर्नाटक):- संसदेने अलीकडेच मंजूर केलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाºया शेतकºयांविषयी केलेल्या ट्वीटवरून बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिच्याविरुद्ध येथील पोलिसांनी सोमवारी गुन्हा नोंदविला.

एक स्थानिक वकील रमेश नाईक यांनी या संदर्भात दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी फिर्याद दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यात कंगनाविरुद्ध लोकांना हिंसाचार करण्यास हेतूपुरस्सर चिथावणी देणे, समाजाच्या दोन गटांमध्ये वितुष्ट निर्माण करणे व इतरांच्या भावना दुखावतील अशी वक्तव्ये करणे, असे आरोप आहेत.

२१ सप्टेंबरच्या ज्या ट्वीटवरून  हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे ते असे होते: ज्या लोकांनी आधी ‘सीएए’बद्दल (सुधारित नागरिकत्व कायदा) अपप्रचार करून अफवा पसरविल्याने (दिल्लीत) दंगल झाली होती तेच लोक आता कृषी कायद्यांवरून अपप्रचार करीत आहेत. हे लोक देशात दहशत माजविणारे दहशतवादी आहेत. मला काय म्हणायचे आहे हे पूर्णपणे समजत असूनही तुम्ही अशा अपप्रचारास बळी पडता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER