काँग्रेसचे खासदार शशी थरूरसह सहा पत्रकारांवर देशद्रोहाचा गुन्हा

नवी दिल्ली :- काँग्रेसचे खासदार शशी थरूर (MP Shashi Tharoor) आणि सहा पत्रकारांवर पोलिसांनी देशद्रोह, गुन्हेगारी षडयंत्र आणि जाणीवपूर्वक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करण्याचा आरोप ठेवला आहे. एफआयआरमध्ये मृणाल पांडे, राजदीप सरदेसाई, विनोद जोस, जाफर आगा, परेश नाथ आणि अनंत नाथ या पत्रकारांचा समावेश आहे.

प्रजासत्ताकदिनाला (Republic Day) झालेल्या ट्रॅक्टर रॅलीवेळी हिंसाचार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी शशी थरूर आणि सहा पत्रकारांवर गुन्हे दाखल केले आहेत. याचबरोबर या सर्वांवर मध्यप्रदेशातही दोन गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

नोएडाच्या पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत शशी थरूर आणि पत्रकारांनी डिजिटल ब्रॉडकास्ट आणि सोशल मीडियाच्या पोस्टद्वारे दिल्ली पोलिसांनी ट्रॅक्टर रॅलीदरम्यान एका शेतकऱ्याला गोळी मारल्याचा दावा केला होता. यामुळे लाल किल्ल्यावर हिंसाचार भडकला, असा आरोप या तक्रारीत करण्यात आला  आहे. २६ जानेवारीला हजारो शेतकरी आणि पोलिसांमध्ये ट्रॅक्टर रॅलीदरम्यान हिंसाचार झाला होता. अनेक आंदोलक लाल किल्ल्यात घुसले  होते आणि पोलिसांवर हल्ला केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER