सदाभाऊ खोत यांच्या मुलावर गुन्हा नोंद

F.I.R

सांगली : भाजपसह (BJP) मित्र पक्षांनी शनिवारी केलेल्या दूध दरवाढ आंदोलनात दूध रस्त्यावर ओतल्याबद्दल आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत यांच्यासह बारा जणांवर इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बंदी आदेशाचा भंग करून दुधाचे नुकसान केल्याबद्दल इस्लामपूर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला.

दुधाच्या खरेदी दर वाढवून मिळावा, त्यासाठी राज्य सरकारनं अनुदान द्यावं, या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या दूध संकलन बंद आंदोलनाला सुरुवात झाली आहे. शेतकरी संघटनांसह भाजप व मित्र पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. ठिकठिकाणी निदर्शने केली होती. पश्चिम महाराष्ट्रात या आंदोलनाचा मोठा परिणाम दिसला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER