महिला बँक अधिकाऱ्याच्या गळ्याला चाकू लावून केली १० लाखांची मागणी

नाशिक : दुपारच्या सुमारास थेट बँकेत जाऊन महिला व्यवथापकाच्या गळ्याला चाकू लावून ‘मला जगण्यासाठी १० लाख रुपये द्या’, अशी मागणी एका व्यक्तीने केल्याची खळबळजनक घटना नाशिक येथे घडली.

पोलिसांनी (Nashik news) दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.७) एम. जी. रोडवरील बँकेत पिवळा शर्ट व जीन्स घातलेला, तोंडावर मास्क असलेला एक जण ग्राहक म्हणून आला. येथील सर्व्हिस ऑपरेशन व्यवस्थापक असलेल्या तृप्ती अग्रवाल (४०, रा. सिरीन मेडोज, गंगापूर रोड) यांच्याजवळ येऊन तो थर्ड पार्टी पेमेंटच्या पद्धतीबाबत विचारू लागला. यावेळी त्यांनी त्यास लांब उभे राहण्यास सांगितले.

यानंतर ही व्यक्ती बँकेतून निघून गेली; मात्र पुन्हा काही मिनिटांत माघारी फिरली आणि थेट अग्रवाल यांच्या खुर्चीजवळ जात त्यांची मान एका हाताने आवळत दुस-या हाताने चाकू गळ्याला लावला. ‘मला जगण्यासाठी १० लाख रुपये पाहिजे, पैसे काढून द्या. ’ अशी मागणी त्याने केली. दरम्यान, बँकेचे  विभागीय अधिकारी यांनी स्वत: त्याची मागणी पूर्ण करणार असल्याचे सांगितले आणि अग्रवाल यांना सोडून देण्याचा आग्रह धरला.

यावेळी त्या चाकूधारी व्यक्तीचा विश्वास बसल्याने त्याने मानेवरचा चाकू काढला आणि अग्रवाल यांना सोडले. तोपर्यंत बँकेत पोलीस दाखल झाले आणि बोराडे यास ताब्यात घेतले. अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात चाकूधारी बोराडेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER