आमदार रवी राणांविरुद्ध गुन्हा दाखल

Ravi Rana

अमरावती : बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्याविरोधात राजापेठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासनाची कुठलीही परवानगी न घेता संचारबंदी लागू असताना अमरावती शहरातील राजापेठ येथील रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपुलाचे उद्घाटन केल्याप्रकरणी आमदार रवी राणा यांच्याविरोधात राजापेठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहितीनुसार , शनिवारी सकाळी बेकायदेशीर  आमदार रवी राणा यांनी उड्डाणपुलाचे उद्घाटन केले होते. त्यांनी त्यासाठी ऑटोरिक्षा आणि १५-२०  कार्यकर्ते जमवले होते. या प्रकरणी राजापेठ पोलिस स्टेशनमधील सहायक पोलिस निरीक्षक गजानन मेहेत्रे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार शनिवारी रात्री आपत्ती व्यवस्थापन कायदा उल्लंघन केल्याप्रकरणी भादंवि कलम १८८, २६९ नुसार संचारबंदी, साथरोग कायद्याचे उल्लंघन प्रकरणात आमदार रवी राणा यांच्यासह कार्यकर्ते आणि ऑटो रिक्षाचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER