संभाजीराजेंवर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा दाखल

Chhatrapati Sambhaji Raje-Gunaratna Sadavarten'

नाशीक : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काल एका वृत्तवाहिनीवर बोलताना गुणरत्न ऍड. सदावर्ते (Gunaratna Sadavarten) यांनी खासदार छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. सदावर्तेंचे वक्तव्य अत्यंत निंदनीय असल्याचे म्हणत सकल मराठा क्रांती मोर्च्याने त्यांचा निषेध केला होता. यासाठी सकल मराठा समाज आणि करण गायकर यांनी तक्रार दाखल केली.

नाशिकमधील सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये सदावर्ते यांच्याविरुद्ध गुन्हा दखल करण्यात आला आहे. गुणरत्न सदावर्ते यांना अटक करा आणि त्यांची वकिलीची सनद रद्द करा, अशी मागणी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली होती. गुणरत्न सदावर्तेंविरोधात कोल्हापुरात संताप व्यक्त करण्यात आला. उत्तरेश्वर पेठ तरुण मंडळाने गुणरत्न सदावर्ते यांच्या पोस्टरला कोल्हापुरी चप्पल मारून निषेध केला. कोल्हापूर शहरातील शिवाजी चौकात आंदोलन करण्यात आले.

विनायक मेटेंची मागणी

अॅड.  गुणरत्न सदावर्ते यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीवरील चर्चेत छत्रपती आणि त्यांच्या घराण्याबद्दल जे वक्तव्य केले, ते अतिशय खालच्या पातळीचे आहे. मी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा धिक्कार करतो, निषेध करतो. हा माणूस आधीपासूनच समाजात द्वेष पसरवण्याचं काम करतो आहे. जातीयवाद पसरवतो आहे. सदावर्ते यांच्यावर महाराष्ट्र सरकारने स्वतः गुन्हे दाखल केले पाहिजेत. त्यांना अटक केली पाहिजे. जातीयवाद आणि सांप्रदायिक दंगली भडकवण्याचा त्यांचा उद्देश आहे, तो रोखला पाहिजे अशी मागणी विनायक मेटेंनी केली होती.

गुणरत्न सदावर्ते यांच्या वकिलीची सनद बार कौन्सिलने काढून घेतली पाहिजे, अशी आमची स्पष्ट मागणी आहे. कोणत्याही परिस्थितीत असा माणूस जो छत्रपतींबद्दल घाणेरड्या, अतिशय वाईट भाषेत बोलतो, त्याची वकील म्हणवून घ्यायची लायकी नाही. मी पुन्हा गुणरत्न सदावर्ते यांचा निषेध करतो आणि महाराष्ट्र सरकारकडे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी करतो, असा संताप विनायक मेटे यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER