खंडणीप्रकरणी माजी नगरसेवकावर गुन्हा

Crime against former corporator in ransom case

कोल्हापूर :- हातकणंगले तालुक्यातील माणगाववाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय सहकारी संस्था औद्योगिक वसाहतीचे संस्थापक अध्यक्ष रवी रजपुते यांच्यावर २० लाख रुपये खंडणीचा गुन्हा पोलिसात दाखल झाला.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा त्याग करून रजपुते यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. या बड्या राजकीय नेत्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. बंद पडलेली मागासवर्गीय सहकारी औद्योगिक संस्था चालू करण्यासाठी २० लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. उद्योजक शीतल केटकाळे यांनी रजपुते यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

इचलकरंजी येथील माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांच्या माणगाववाडीमधील शाहूराजे मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था, होलार मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था आणि रविचंद्र महिला मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था या संस्था सध्या बंद स्थितीत आहेत. या संस्था चालू करण्यासाठी रजपुते यांनी उद्योजक शीतल आदिनाथ केटकाळे यांच्याकडून २० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. याची पोलिसांनी खात्री केली. त्यानंतर शीतल केटकाळे यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात रजपुते यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER