तस्लिमा नसरीन यांनी उपहासात्मक व्टिट करताना क्रिकेटपटू मोईन अलीवर साधला निशाणा

Moeen Ali - Taslima Nasreen - Maharastra Today
Moeen Ali - Taslima Nasreen - Maharastra Today

इंग्लंडचा क्रिकेटपटू मोईन अली (England Cricketar Moeen Ali) याच्याबद्दल ख्यातनाम लेखिका तस्लिमा नसरीन (Taslima Nasreen) यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाने वादळ उठले आहे आणि त्यात क्रिकेट जगत भक्कमपणे मोईनच्या पाठीशी उभे राहिले आहे. तस्लीमा नसरीन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेय की, मोईन अली क्रिकेटमध्ये व्यस्त नसता तर तो सिरियात जाऊन आयसीसमध्ये दाखल झाला असता. ( “If Moeen Ali were not stuck with cricket, he would have gone to Syria to join ISIS”.) मोईनचे सहकारी जोफ्रा आर्चरपासून बेन डकेटपर्यंत सर्व त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत.

तस्लिमा नसरीन यांनी अचानक या प्रकारचे व्टीट का केले हे स्पष्ट झालेले नाही पण काही दिवसांपूर्वीच मोईन अलीने चेन्नई सुपर किंग्जच्या व्यवस्थापनाला आपल्या जर्सीवरुन मद्याच्या कंपनीचा लोगो काढण्याची विनंती केली असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र चेन्नई सुपर किंग्ज व्यवस्थापनाने मोईनकडून अशी काही अधिकृत विनंती आल्याचा इन्कार केला आहे. 33 वर्षीय मोईन यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार आहे.

तस्लिमा नसरीन यांनी सोमवारी हे व्टिट केल्यानंतर मंगळवारी त्याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. त्यात त्यांनी म्हटलेय की, मोईन अलीबाबतचे आपले ट्विट हे उपहासात्मक असल्याचे आपले द्वेषकर्ते चांगले जाणून आहेत. पण मी मुस्लीम समुदायाला निधर्मी करण्याचा प्रयत्न करतेय आणि इस्लामी कट्टरवादाल माझा विरोध असल्याने त्यांनी याचे भांडवल करुन वाद पेटवला आहे. मानवतेच्या दृष्टीने ही मोठी दुःखाची बाब आहे की, डाव्या विचारसरणीचे महिलांचे समर्थक आता महिला विरोधी इस्लामी विचारांचे समर्थन करत आहेत.

तस्लिमा नसरीन या धार्मिकतेसंदर्भातील आपल्या विचारांमुळे नेहमीच वादात राहिल्या आहेत. त्यांच्यावर हल्लेसुध्दा झाले आहे. या विचारांपायी 1994 मध्ये त्यांना बांगलादेश सोडून इतरत्र आश्रयसुध्दा घ्यावा लागला होता. त्यांचा बांगलादेशी पासपोर्टसुध्दा रद्द करण्यात आला होता. आता मोईनवरील ट्विटनंतर त्या टीकेचे लक्ष्य बनल्या असून अनेकांना त्यांच्या व्टिटर अकाउंटवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

मोईनचे इंग्लंडच्या संघातील सहकारी खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभे असून जोफ्रा आर्चरने नसरीन यांना तुम्ही व्यवस्थीत तर आहात ना? मला वाटते तुमचे काहीतरी तंत्र बिघडलेय असे म्हटले,आहे. उपहासात्मक ट्विट असल्याच्या नसरीन यांच्या स्पष्टीकरणाबद्दलही त्याने म्हटलेय की, उपहासात्मक? पण कुणालाच हसू आलेले नाही..अगदी तुम्हालासुध्दा..ते ट्विट डिलीट करणे हाच आता तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.

इंग्लंडचा जलद गोलंदाज साकिब मेहमूद याने म्हटलेय की, अतीशय तिरस्कारजनक व्टिट आहे. व्यक्तीसुध्दा तशीच आहे. इंग्लंडचा फलंदाज बेन डकेट याने म्हटलेय की, व्टिटरसोबत ही समस्या आहेच. कुणीही काहीही लिहू शकते. तिरस्कार करावा असे..हे बदलायला हवे. कृपया या अकाउंटवर बंदी घालण्याची मागणी करा.

मोईन अली हा बर्मिंगहॕम आहे. तो म्हणतो की, मी मुस्लीम आहे आणि ब्रिटीश आहे या दोन्ही गोष्टींचा मला अभिमान आहे. आशियाई खेळाडूंनी माझ्याकडे बघावे आणि यांच्यासारखीच आपलीसुध्दा क्रिकेटमध्ये कारकीर्द होऊ शकते याचा विचार करावा असे त्याने दोन वर्षांपूर्वी म्हटले होते.

2014 मध्ये भारताविरुध्दच्या कसोटी सामन्यावेळी ‘पॕलेस्टाईन मुक्त करा’ आणि ‘गाझा’ वाचवा अशा आशयाच्या पट्ट्या मनगटावर बांधून तो खेळला होता. त्याच्या या कृतीने अनेकांना त्याने नाराज केले होते. त्याला काही धमक्यासुध्दा मिळाल्या होत्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेसुध्दा त्याला ताकिद दिली होती. मोईनने गाझा वाचवा मोहिमेचा कार्यकर्ता म्हणून काम केलेले नसले तरी गाझा मदतकार्यासाठी निधी उभारण्यास त्याने मदत केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button