भारतीय क्रिकेट संघातील खेडाळुचे भगवे लूक बघा !

india-team-new-jersy-see-photos

मुंबई : ICC Cricket World Cup स्पर्धेत आता चुरस वाढली आहे. भारताने आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये अपराजित राहत गुणतक्त्यात पहिल्या चारमध्ये आपले स्थान मिळावंलं आहे. भारताने सहापैकी पाच सामने जिंकले असून एक सामना पावसामुळे रद्द झाला. भारत पुढचा सामना 30 जूनला इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर बांगलादेश आणि लंकेविरुद्ध सामना होणार आहे.

दरम्यान भारत इंग्लंडविरुद्ध खेळताना वेगळ्या रंगाच्या जर्सीत खेळणार आहे. इंग्लंड आणि भारताच्या जर्सीचा रंग मिळताजुळता असल्याने एका संघाला सामन्यावेळी वेगळी जर्सी घालावी लागणार आहे. इंग्लंडला त्यांच्याच जर्सीत खेळण्याची मुभा आहे. वर्ल्ड कपचे यजमानपद इंग्लंडकडे असून त्यांना आहे त्या जर्सीत खेळता येणार आहे. आतापर्यंत भारताने वर्ल्ड कप स्पर्धेत निळ्या रंगाची जर्सी घातली पण इंग्लंडचीही जर्सी निळ्या रंगाची असल्यामुळे भारताला जर्सीचा रंग बदलावा लागणार आहे.

हि बातमी पण वाचा : दिलजला म्हणूनच खतरनाक मोहम्मद शमी