क्रिकेट म्युझिअम उभारणार; आदित्य ठाकरे आणि शरद पवार यांची भेट

aditya thackeray meet sharad pawar

मुंबई: मुंबईत आंतरराष्ट्रीय स्तरावरचे क्रिकेट म्युझियम उभे करायचे आहे. त्यासाठी शरद पवारांची मदत लागणार आहे. शरद पवार हे राजकीय क्षेत्रातील जाणकार असण्याबरोबरच क्रिकेटच्या क्षेत्रातही त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्यामुळे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना मुंबईत क्रिकेट म्युझिअम उभारण्यासाठी शरद पवार यांची मदत लागणार आहे. यासाठीच त्यांनी पवार यांची भेट घेतली आहे.

आदित्य ठाकरे यांनी ही माहिती त्यांच्या ट्विटरवरूनदेखील दिली आहे.

आदित्य ठाकरे म्हणालेत, आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत बैठक पार पडली. यावेळी पर्यटन, उद्योग, पर्यावरण आणि महाराष्ट्रात येणाऱ्या अनेक प्रकल्पांबाबत चर्चा झाली. तसेच मरिन ड्राईव्हचा विकास, हेरिटेज आणि उद्योग विभागाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

अनेक प्रकल्प महाराष्ट्रात येऊ इच्छित आहेत. त्यांना कसं सामावून घ्यायचं याबाबतही चर्चा करण्यात आल्याचंही आदित्य ठाकरेंनी सांगितले. या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.

शिवभोजन थाळी’ला सिद्धिविनायक पावला, ५ कोटींचे मदत जाहीर