शशी थरूर यांच्यावर क्रिकेटप्रेमी का भडकले?

Devdutta Padikkal-Shashi Tharoor

सुमित्रा महाजन यांच्याबद्दलच्या खोट्या बातमीचा शिकार ठरलेले काँग्रेसचे खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) आणखी एका ट्विटमुळे ट्रोल होत आहेत आणि हे ट्विट क्रिकेटसंदर्भात आहे. आयपीएलमध्ये (IPL) शुक्रवारी आरसीबीच्या   (RCB) देवदत्त पडीक्कलने (Devdutta Padikkal) केलेल्या शतकी खेळीसंदर्भात हे ट्विट आहे. त्यात शशी थरूर यांनी म्हटलेय की, ” यंदाच्या आयपीएलमध्ये शतक करणारे दोन्ही खेळाडू मल्याळी आहेत हे बघून आनंद होतो. क्रिकेटमध्ये केरळ पीछाडीवर आहे असे म्हटले जाते. त्या पार्श्वभूमीवर ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. अभिनंदन देवदत्त संजू सॅमसनच्या (Sanju Samson) पंक्तीत येऊन बसल्याबद्दल.”

How amazing that both the centuries in this year’s #IPL have been scored by Malayalis, when Kerala has so long been regarded as a cricketing backwater! Congratulations @devdpd07 for joining @IamSanjuSamson as the only two to cross the hundred mark so far this year.

थरूर यांच्या या ट्विटवर लगेच प्रतिक्रिया उमटल्या; कारण देवदत्त मल्याळी असला तरी तो लहानचा मोठा बंगळुरूमध्ये झाला आहे आणि तो कर्नाटकसाठीच खेळतोय. कर्नाटककडून खेळूनच त्याची कारकीर्द बहरली आहे. त्यामुळे थरूर यांच्या या ट्विटवर कानडी बांधवांचा संताप झाला असून त्यांनी थरूर यांना आम्ही देवदत्तला मल्याळी मानतच नाही. तो कानडीच आहे असे सुनावले आहे.

यासंदर्भात माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू दोद्दा गणेश याने ट्विटद्वारेच थरूर यांना रोखठोक उत्तर देताना म्हटलेय, “२०१६ मध्ये करुण नायरने त्रिशतक झळकावले होते तेव्हासुद्धा अनेकांनी असेच श्रेय घेण्याचा प्रयत्न केला होता आणि नंतर त्याने संघातील स्थान गमावले तेव्हा तेच लोक त्याला ओळखेनासे झाले होते. आता देवदत्तबाबतही तेच होतेय. ते मल्याळी आहेत हे मान्य पण करुण व देवदत्त हे क्रिकेटपटू म्हणून चमकले यात केरळचे काहीच योगदान नाही. ते कर्नाटकचे आहेत. त्यांना मी बालपणापासून चांगले ओळखतो आणि त्यांच्यात काय ताकद आहे याची मला माहिती आहे. ते मूळचे कोण याबद्दल मी बोलत नाही. त्यांचे मूळ कुठले याबाबत मी थरूर यांच्याशी सहमत आहे; पण पुन्हा सांगतो ती कर्नाटकची मुले आहेत आणि हेच मला सांगायचे आहे.”

Well, a lot of people owned Karun Nair after he scored a triple century in 2016 and disowned him after he lost his place. Now the same with Devdutt. Agree, they’re Malyalis. But, Kerala had no role in Karun & Devdutt’s progress as cricketers. They’re Karnataka boys. Period. I’ve seen their cricketing prowess from a very young age and know them personally very well. I didn’t talk of their origin. Only agreed to Mr Tharoor’s comments on their origin and also reiterated that they’re Karnataka boys. That’s it.”

दोद्दा गणेशच्या या ट्विटवर अनेक जणांनी सहमती व्यक्त केली आहे आणि एकाने तर म्हटलेय की, कर्नाटक आणि केरळचा जरी सामना झाला तरी देवदत्त पडीकल्ल कर्नाटककडूनच खेळेल. यावरूनच तो कोणत्या राज्याच्या आहे हे सिद्ध होते.

एकाने तर थरूर यांना तुम्हीसुद्धा त्यांच्या क्रिकेटमधील कामगिरीबद्दल न बोलता ते कोण, कुठले असे विषय करत असाल तर तुमच्यात व इतर राजकारण्यांमध्ये फरक काय? असा सवाल केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button