किक्रेटचा देव सचिन तेंडूलकर होतोय नेटीझन्सकडून ट्रोल

Cricket god Sachin Tendulkar is becoming a troll from netizens

सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) त्याच्या ट्विटमुळे चर्चेत आल्याच्या घटना फार कमी आहेत. पण यावेळी मात्र एक ट्विटमुळे सचिन चर्चेत आलाय.

दिल्लीत नव्या शेतकरी कायद्याविरोधात (Farmesr Agriculture Law) आंदोलन सुरु आहे. पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी मोठ्या संख्येनं रस्त्यावर आले आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी २६ जानेवारीला पोलीस आणि आंदोलक शेतकरी यांच्यात हिंसाचार झाल्याची घटनाही घडली. या हिंसाचारणानंतर शेतकरी आंदोलनाला वेगवेगळ्या स्तरातून आणि वेगवेगळ्या देशातून शेतकरी आंदोलनाला अजून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळायला सुरुवात झाली.

दरम्यान सध्या शेतकरी आंदोलन सुरु असताना आंतरराष्ट्रीय पॉप गायिका रिहाना हिने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारं ट्विट केलं होतं. #FarmersProtest  हा हॅशटॅग वापरून, आपण या विषयावर का बोलत नाही आहोत हे ट्विट रिहानाने केलं होतं. त्यानंतर शेतकरी आंदोलनाच्या समर्थकांनी हे ट्विट उचलून धरलं. परदेशातले सेलिब्रिटी या विषयावर बोलत असताना भारतातले सेलिब्रिटी मात्र गप्प आहेत असं आंदोलन समर्थकांचं म्हणणं होतं.

रिहानाच्या ट्विट नंतर, पर्यावरण क्षेत्रातली कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिनेही ट्विट करून शेतकरी आंदोलनाच्या सोबत असल्याचं ट्विट केलं होतं. मिया खलिफाने याच संदर्भात ट्विट केलं.

आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींच्या ट्विट्स नंतर भारतातल्या अनेक सेलिब्रिटींकडून ट्विट्स करण्यात आले. सचिनने ट्विट केल्यानंतर मात्र सचिन चर्चेत आला आहे. ट्विट मध्ये सचिन म्हणालाय, “भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाणार नाही. बाह्यशक्ती बघ्याची भूमिका घेऊ शकतात पण हस्तक्षेप करू शकत नाही. भारतीयांना भारत माहिती आहे आणि देश म्हणून आपण एकत्र राहूया.”

सचिन आणि अनेक भारतीय सेलिब्रिटींना हा प्रोपोगांडा असल्याचं ट्विट केलंय. अजय देवगण, कैलाश खेर, साईना नेहवाल, अक्षय कुमार आणि अनेक सेलिब्रिटींनी #IndiaTogether आणि #IndiaAgainstPropoganda हे दोन हॅशटॅग वापरून ट्विट केलं आहे.

सचिनच्या ट्विट नंतर मात्र दोन वेगवेगळ्या प्रकारची मतं नेटकऱ्यांमध्ये दिसून आले आहेत. अनेकांनी सचिनच्या मताचं समर्थन केलंय. पण सचिनला मोठ्या प्रमाणात ट्रोलही केलं जाताना दिसतंय. अनेकांनी शेतकरी आंदोलनं हा कसलाच प्रोपोगांडा नाही असं म्हणत सचिनची खिल्ली उडवली आहे. तर अनेक लोक फेसबुक आणि ट्विटरवर, इतके दिवस शेतकरी आंदोलन चालू आहे, तेव्हा सचिन कुठे होता असा प्रश्न उपस्थित करताना दिसतायेत.

अभिनेत्री तापसी पन्नू हिने मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. तापसी रिहानाच्या समर्थानात आपल्या ट्विट मध्ये म्हणते, “जर एक ट्विट तुमची एकता डोसू शकत असेल, एक विनोद तुमची आस्था दुखावु शकत असेल आणि एक कार्यक्रम तुमच्या धार्मिक भावना दुखावत असेल, तर इतरांना प्रोपोगांडा शिकवण्यापेक्षा  तुम्हाला तुमच्या मूल्यव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी काम करण्याची गरज आहे”

ट्विटरवरच्या या वातावरणात नेटकऱ्यांनी  मात्र सचिन तेंडुलकरच्या ट्विटला ट्रोल केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER