क्रिकेटप्रेमींसाठी या दिवशी मिळेल खजिना, एकाच दिवशी तीन तीन सामने

International cricket council

सिडनी :- भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या मालिकेसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या (Cricket) अतिशय व्यस्त कार्यक्रमाला शुक्रवार, 27 तारखेपासून सुरुवात होत आहे. एकट्या 27 रोजीच तीन आंतरराष्ट्रीय सामने होणार आहेत आणि 2020 ला निरोप देण्याआधी आता एकूण पाच वेळा असे होणार आहे की एकाच दिवशी क्रिकेटचे तीन- तीन आंतरराष्ट्रीय सामने खेळले जाणार आहेत.

4 व 6 डिसेंबर रोजी तर कसोटी, वन डे आणि टी-20 अशा तिन्ही प्रकारचे सामने होणार आहेत. तर 26 डिसेंबरला एकाच दिवशी तीन कसोटी सामन्यांना सुरुवात होणार आहे.

एकाच दिवशी तीन आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने

27 नोव्हेंबर – शुक्रवार
वन डे- भारत वि. ऑस्ट्रेलिया, सिडनी
टी-20- न्यूझीलंड वि. वेस्टइंडिज, आॕकलंड
टी-20- द. आफ्रिका वि. इंग्लंड, केपटाऊन

29 नोव्हेंबर – रविवार
वन डे- भारत वि. ऑस्ट्रेलिया,सिडनी
टी-20- वेस्ट इंडिज वि. न्यूझीलंड, मोंगानुई
टी-20- द. आफ्रिका वि. इंग्लंड, पार्ल

4 डिसेंबर – शुक्रवार
कसोटी- न्यूझीलंड वि. वेस्ट इंडीज, हॕमिल्टन
वन डे- इंग्लंड वि. द. आफ्रिका, केपटाऊन
टी-20- भारत वि. ऑस्ट्रेलिया, कॕनबेरा

6 डिसेंबर – रविवार
कसोटी- न्यूझीलंड वि. वेस्ट इंडीज, हॕमिल्टन
वन डे- द. आफ्रिका वि. इंग्लंड, पार्ल
टी-20- भारत वि. ऑस्ट्रेलिया, सिडनी

26 डिसेंबर-
कसोटी- भारत वि. ऑस्ट्रेलिया, मेलबोर्न
कसोटी- पाकिस्तान वि. न्यूझीलंड, मोंगानुई
कसोटी- द. आफ्रिका वि. श्रीलंका, सेंचुरियन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER