स्मशानभूमीत एकावेळी १९ मृतदेहांवर अंत्यसंस्कार; ८ मृतदेहांवर उद्या अंत्यविधी होणार

Cremation of COVID Dead Bodies

उस्मानाबाद :- महाराष्ट्रात कोरोनाचे (Corona) थैमान सुरूच आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे. सध्या राज्यात महामारीचे भायवाय दृश्य पाहायला मिळत आहे. अशावेळी राज्यातील विविध शहरातील स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागासुद्धा अपुरी पडत आहे.

असेच काहीसे दृश्य उस्मानाबादमध्येही पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यू प्रमाण वाढत आहे. त्यामुळे उस्मानाबादेतील स्मशानभूमीत एकाचवेळी अनेक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. तिथल्या शहरानजिक असलेल्या स्मशानभूमीत आज १९ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर ८ मृतदेहांवर अद्यापही अंत्यविधी होणे बाकी आहे. स्मशानभूमीत अवघ्या एक-एक फुटाच्या अंतराने सरण रचण्यात आली आहेत. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा कमी पडत आहे. त्यामुळे काही मृतदेहांवर उशिराने अंत्यसंस्कार होत आहे.

कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडांची कमतरता भासत आहे. त्यामुळे एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडेही कमी प्रमाणात वापरली जात आहेत. आज सर्व मृतदेहांवर अंत्यसंस्कार होऊ न शकल्यामुळे राहिलेल्या मृतदेहांवर उद्या अंत्यविधी करण्यात येणार आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button