पतसंस्थाच्या एन.पी.ए. (NPA)निकषात बदल

NPA-1 Year

सांगली : कोरोनामुळे (Corona) मार्च २०२० मध्ये एन.पी.ए. (NPA) सहा महिन्यांऐवजी नऊ महीने केला होता, सध्यस्थितीचा विचार करुन २०२०-२१ सालाकरीता एन.पी.ए १२ महिने करण्यात आला. याबाबत पतसंस्था फेडरेशनने पाठपुरावा केला होता. या निर्णयाने राज्यातील सुमारे दहा हजार पतसंस्थांना दिलासा मिळाला आहे.

कोरोनामुळे लोकांचे उद्योग, व्यवसाय ठप्पच झाल्याने उत्पन्नामध्ये घट होऊन पतसंस्था, बँकाचे हप्ते थकले आहेत. त्यामूळे थकबाकी वाढतच चालली आहे. परिणामी पतसंस्थाच्या नफ्यावर परिणाम होऊन उत्पन्न घटणार आहे. ऑडिट वर्गही कमी होणार आहे. यापार्श्वभूमीवर फेडरेशनने एनपीएमध्ये वाढ करण्याची मागणी केली होती. लेखापरिक्षण गुणतक्त्यात शिथीलता आणली आहे. बंद असणाऱ्या बँकातील गुंतवणूकीवरील तरतूद वीस ऐवजी दहा टक्के मंजूरी दिली आहे.

जिल्हयात सद्या दहा पतसंस्था कार्यरत असून त्यामध्ये सर्वसाधारण २५ हजार कोटी ठेवी व २२ हजार कोटी कर्ज वाटप आहे. शासनाच्या निर्णयामुळे पतसंस्थांना तसेच सर्वसामान्य कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. ठेवी संरक्षण, नियाम मंडळ रद्द करा, लाभांश वाटप पारदर्शक करा, प्रशिक्षण केंद्र मंजूर करा, नाममात्र सभासदांशी व्यवहारास परवानगी द्या, आदी मागण्याबाबतही फेडरेशनतर्फे पाठपुरावा सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER