
मुंबई: पुण्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आज कृष्णकुंज निवासस्थानी जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली.
पुण्यातील सोमाटणे टोल नाक्यावर (Toll Naka) टोल माफी नागरिकांना मिळावी अशी मागणी या शिष्टमंडळाने केली होती, या मागणीसाठी तेथील नेते सातत्याने पाठपुरावा करत होते, त्यासाठी राज ठाकरेंकडे हे शिष्टमंडळ आधीही आलं होतं, ती मागणी आता पूर्ण झाली आहे, त्यामुळे राज ठाकरेंचे आभार मानन्यासाठी हे नेते आज कृष्णकुंजवर आले होते.
वर्सोली टोल नाका आणि सोमाटणे- तळेगाव दाभाडे टोलनाका हे दोन टोलनाके मावळ तालुक्यातील नागरिकांना माफ करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती सर्वपक्षीय टोल हटाव कृती समितीने दिली आहे. याचा फायदा एमएच 14 या मावळ भागातील नागरिकांना होणार आहे, राज ठाकरेंच्या प्रयत्नानेच ही टोल माफी मिळाली असे सांगत या शिष्टमंडळाने या टोलमाफीचे क्रेडीट राज ठाकरे यांना दिले आहे. त्यामुळे हे सर्व पक्षीय शिष्टमंडळाने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. विशेष म्हणजे मनसेने हा मुद्दा उठवून धरला होता.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला