साधू संतांच्या जीवनमुल्यांमुळे सशक्त समाजाची निर्मिती : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Bhagat Singh Koshiyari

कोल्हापूर : भारतातील साधू संतांनी शिकवलेल्या जीवनमुल्यांमुळे सशक्त समाजाची निर्मिती झाली. हीच आपल्या देशाची महती आहे. संतांच्या वाणीने आत्मा शुद्ध होतो. व्यावहारिक आयुष्य जगताना सूर्याच्या किरणांप्रमाणे त्यांच्या साधना प्रकाश आपल्यावर पडावा, यासाठी काही काळ तरी ऋषीमुनींच्या सानिध्यात घालवा, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बुधवारी येथे केले.

राजश्री शाहू महाराज यांना भारतरत्न द्या : मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे मागणी

सदभावना, नैतिकता आणि नशामुक्तीचा संदेश जनमानसात रुजवण्यासाठी भारत पदयात्रेला निघालेले आचार्य श्री महाश्रमणजी यांच्या नागरिक सत्कारानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भक्तीपूजा नगरमध्ये श्री जैन श्वेतांबर तेरापंथी सभेच्यावतीने या दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मुनी कुमार श्रवण यांनी पदयात्रेचा उद्देश सांगितला. विजयराज पैराणिक मनोगत व्यक्त केले. उत्तमचंद पगारिया यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.