ईज ऑफ डुइंग बिजनेस अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी कृती आराखडा तयार करा- मुख्यमंत्री

CM Uddhav Thackeray

मुंबई :- संपूर्ण देशात महाराष्ट्र सर्व गुंतवणूकदारांसाठी पहिल्या पसंतीचे राज्य आहे. राज्याचा हा लौकिक कायम राखण्यात ईज ऑफ डुइंग बिजनेस (Ease of doing business) महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आपले राज्य उद्योग क्षेत्रात आणखी एक पाऊल पुढे राहण्यासाठी ईज ऑफ डुइंग बिजनेस अधिक प्रभावीपणे राबवायला हवे. याकरिता उद्योग विभागाने कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिले. आज वर्षा निवासस्थानी झालेल्या ईज ऑफ डुइंग बिजनेस आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुंबई (Mumbai) महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव गोपाल रेड्डी, प्रधान सचिव विकास आयुक्त हर्षदीप कांबळे उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, देशात महाराष्ट्र सर्वांत जास्त परकीय गुंतवणूक मिळविणारे राज्य आहे. गुंतवणुकीचा हा ओघ असाच वाढता राहायला हवा. राज्याच्या भरभराटीसाठी अधिकाधिक आकर्षित गुंतवणूक यायला हवी, त्याकरिता ईज ऑफ डुइंग अधिक प्रभावी करायला हवे. उद्योग विभागाने यासाठी ईज ऑफ डुइंग बिजनेस प्रक्रिया अधिक सक्षम करावी. त्याकरिता आवश्यक पावले उचलावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच अशा प्रयत्नामुळेच भविष्यात उद्योग क्षेत्रातील आपल्या राज्याची कामगिरी इतरांसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी उद्योग विभागाकडून सादरीकरण करण्यात आले.

ही बातमी पण वाचा : इंदू मिल स्मारक: डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचा पायाभरणी समारंभ, अनेक मंत्री नाराज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER