८० वर्षांच्या शरद पवारांची क्रेझ, पक्षात येणाऱ्या युवकांच्या संख्येत मोठी वाढ

SHarad Pawar.jpg

नाशिक :- आगामी नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी (Nashik Municipal Corporation Elections) सर्वच पक्ष कामाला लागलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे युवकांमध्ये दिवसेंदिवस आकर्षण वाढत असून पक्षाकडे येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे प्रभाग निहाय बैठकांमध्ये नवीन शेकडो युवकांचा प्रवेश होत आहे. त्यामुळे कोरोना महामारीच्या काळात नागरिकांना मदत करण्यासाठी बाहेर न पडलेले सत्ताधारी आता निवडणुकीच्या काळात बाहेर दिसतील असे प्रतिपादन माजी आमदार जयंत जाधव (Jayant Jadhav) यांनी केले.

आगामी महापालिका निवडणुकांच्या तयारीचा भाग म्हणून राष्ट्रवादी कॅाग्रेसतर्फे प्रभागनिहाय बैटका सुरु आहेत. या बैठकीत ते बोलत होते. जाधव म्हणाले, मागील निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीतील नगरसेवकांनी केलेली विकासकामे सत्ताधारी आपल्या नावावर खपवत आहेत. अशांना नागरिकांनी त्यांची जागा दाखविलीच पाहिजे.

ही बातमी पण वाचा : पवारांची मोठी खेळी; संदीप क्षीरसागरांना केले लिफ्ट, सोबत प्रतिभाताईंचीही साथ

ते म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नागरिकांसाठी रस्त्यावर उतरले परंतु महापालिकेतील सत्ताधारी भीतीमुळे घराबाहेर पडले नाही. आता हेच निवडणुकीच्या काळात मतांसाठी घरोघरी जात आहेत. त्यामुळे सध्याच्या काळात समाजकारण करताना राजकारण करण्याची गरज आहे. नागरिकांच्या जास्तीत जास्त समस्या सोडवा, मोलमजुरी करण्याऱ्या नागरिकांचे लहानातले लहान काम करा. यामुळे त्याचे कुटुंब आपल्या सोबत येईल. सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू ठेऊन विकास कामे केलीत तरच त्यांचे पाठबळ आपल्याला लाभेल नागरिकांची समस्या सोडविण्यासाठी आंदोलने करून प्रचारासाठी सोशल मिडियाचा जास्तीत जास्त वापर करण्याची गरज आहे.

राष्ट्रवादीतील उमेदवारांचे नागरिकांमध्ये चांगल्या प्रस्तामुळे २०१७ च्या महापलिका निवडणुकीत तत्कालीन सत्ताधाऱ्यांना निश्चित अपयश मिळणार या भीतीमुळे त्यांनी दोन सदस्यांचा प्रभाग चार सदस्यांचा केला. परंतु चार सदस्यांच्या कुरघोडीमुळे व प्रभागातील सीमारेषेमुळे प्रभागांचा विकास झाला नाही. नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करणाऱ्या प्रामाणिक व निष्ठावंत कार्यकर्त्यांच यावेळी उमेदवारी मिळेल, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.

ही बातमी पण वाचा : बाळासाहेबांचा शब्द प्रमाण मानून मुख्यमंत्र्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहावे , शरद पवारांचा सल्ला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER