निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा राष्ट्रवादीला खिंडार ; राणेंच्या बंगल्यावर शेकडो पदाधिकाऱ्यांचा भाजपप्रवेश

सिंधुदुर्ग : राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचा धडाका सुरू असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादीला खिंडार पडल्याचं पाहायला मिळत आहे. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या शेकडो पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती धरला. भाजप (BJP) खासदार नारायण राणे (Naryan Rane) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.

कणकवलीत नारायण राणे यांच्या ओमगणेश बंगल्यावर पक्षप्रवेश सोहळा झाला. यावेळी आमदार नितेश राणे, भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली उपस्थित होते. कुडाळ नगरपंचायतीची निवडणूक तोंडावर असताना राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कुडाळ मालवण विधानसभा अध्यक्ष बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष सचिन तेंडुलकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली शेकडो युवक, पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER