कोरोना संकटात गाईला गोंजारल्याने मिळते मानसिक शांती? दर आहे …

cow hugging

कोरोनासाथीच्या (Corona crises) काळात कुटुंबाच्या आरोग्याच्या काळजीमुळे अनेकांचा मानसिक तणाव (Mental stress) वाढला आहे. यावरचा सोपा उपाय आहे गाईला गोंजारणे! (cow hugging) गाईला गोंजारल्याने मानसिक तणाव नाहीसा होतो. देशातील गौविरोधकांनी यावरून संतापण्याचे कारण नाही, कारण मानसिक ताण नाहीसा करण्याचा हा उपचार सुरू आहे युरोप आणि अमेरिकेत! त्यासाठी लोक एक तासासाठी २०० डॉलर (साडेचौदा हजार रुपये) पर्यंत भाडे मोजत आहेत.

युरोप आणि अमेरिकेत काही गोपालकांनी गाईंसोबत राहण्यासाठी गाई भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. यासाठी १ तासाचे २०० डॉलर्सपर्यंत भाडे आकारत आहेत. काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी याचा व्हीडीओ ट्विटरवर व्हायरल केला आहे.

गाईला मिठी मारल्याने केवळ मानसिक तणाव दूर होतो असे नाही तर यामुळे निरोगी राहण्यासही खूप फायदा होतो, असे सांगतात. भारतात गाईला गोंजारणे ही जुनी परंपरा आहे. आता जगात हा ‘ट्रेंड’ बनला आहे.

डॉक्टर म्हणतात …

डॉक्टरांचे म्हणणे आहे की, गाईला गोंजारल्याने लहान मूल किंवा पाळीव प्राणी सोबत असल्याची जाणीव होते. गाईचा स्पर्श हार्मोन ऑक्सिटोसिन, सेरोटोनिन आणि डोपामाइनच्या ट्रिगरचे काम करतो. कोर्टिसोल कमी करतो. तणावाची पातळी, चिंता आणि अस्वस्थपणाही यामुळे कमी होतो.

गाईला गोंजारल्याने शरीराचे तपमान, हृदयाची गती सामान्य होते. शरीरात मेटाबोलिझम, इम्युनिटी आणि तणाव यांच्या क्रिया सुरळीत होण्यात मदत होते.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button