कोविशिल्ड लसीचे दर घटले; आदर पूनावालांची घोषणा

Adar Poonawalla - COVISHIELD - Maharashtra Today
Adar Poonawalla - COVISHIELD - Maharashtra Today

पुणे :- येत्या १ मेपासून देशभरात १८ वर्षांवरील सर्वांचेच कोरोना लसीकरण (Coronavirus Vaccination) करण्यात येणार आहे. त्यासाठी आजपासून नोंदणीला सुरुवात झाली आहे. मात्र लस उत्पादक कंपन्यांनी कोरोना लसीचे दर कमी करावे, अशी सूचना केली. केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकला केली होती. त्यानंतर सीरमचे प्रमुख आदर पूनावाला यांनी कोविशिल्ड लसीच्या किमती राज्य सरकारांसाठी १०० रुपयांनी कमी केल्याची माहिती दिली आहे. आदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी ही माहिती ट्विटद्वारे दिली.

आदर पूनावाला यांनी ट्विट करत कोविशिल्ड लसीच्या किमती कमी करत आहोत. राज्य सरकारांसाठी कोविशिल्डच्या एका लसीच्या डोसची किंमत ४०० वरून ३०० रुपये करत आहोत, अशी घोषणा आदर पूनावालांनी दिली. लसीच्या कमी केलेल्या किमती तत्काळ लागू होतील. कोविशिल्डच्या लसीची किंमत कमी केल्यानं देशातील नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी मदत होईल, असं पूनावाला म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button