देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ३९ लाखांच्या पार

Corona

मुंबई : भारतात कोरोनाची साथ वाढतेच आहे. देशात कोरोनाच्या (Corona) रुग्णांचा आकडा ३९ लाखांच्या वर गेला आहे. ६८.५ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी ३० लाखांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. सध्या देशात कोरोनाचे ८.३ लाख रुग्ण ‘ऍक्टिव’ आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार देशात ३ सप्टेंबरपर्यंत कोरोनाच्या ४,६६,७९,१४५ चाचण्या झाल्या आहेत. फक्त गुरुवारी, एकाच दिवशी ११,६९,७६५ चाचण्या करण्यात आल्या. भारताने कोरोनाच्या चाचण्यांच्या बाबतीत विक्रम केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की – बुधवारी देशात ११,७२,१७९ इतक्या विक्रमी चाचण्या केल्या आहेत.

भारतात आतापर्यंत ४,५५,०९, ३८० चाचण्या करण्यात आल्या आहेत. जगात दररोज सर्वाधिक कोरोना चाचण्या करणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. जगभरात सर्वाधिक कोरोना चाचण्या करणारा भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. देशभरात प्रयोगशाळांच्या वेगवान विस्तारामुळे चाचण्यांमध्येही वाढ झाली आहे. भारतात सध्या १६२३ लॅब असून त्यापैकी १०२२ सरकारी तर ६०१ खासगी आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER