कोविड : पवारांनी रयत शिक्षण संस्थेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीत दिला २ कोटी ७५ लाखांचा चेक

Sharad Pawar & Uddhav Thackeray

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना कोविड नियंत्रणाच्या मदतीसाठी रयत शिक्षण संस्थेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीत २ कोटी ७५ लाखांचा चेक दिला. यासाठी पवार यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेतली. ही भेट पंधरा- वीस मिनिटात आटोपली. या थोड्या वेळात पदवीधर मतदार संघाची निवडणूक, विधान परिषदेसाठी नियुक्त आमदारांसाठी राज्यपालांकडे देण्यात आलेली यादी व त्यावर राज्यपालांची भूमिका या विषयांवर चर्चा झाली अशी माहिती सूत्रांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER