डॉक्टरांनी आक्षेप घेतल्यानंतर महाराष्ट्र सरकारने ऑक्सिजनच्या वापरावरील मर्यादा मागे घेतली

Oxygen Cylinders

मुंबई : राज्यात कोरोनाची (Corona) स्थिती आता गंभीर झाली आहे. रुग्णांची संख्या वेगाने वाढली असून अनेक ठिकाणी हॉस्पिटल आणि उपचाराविना जीव गमवावा लागत आहे. त्यातच महाराष्ट्र सरकारने ऑक्सीजन वापरावर प्रतिबंध आणल्याने राज्यातील डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली होती. प्रत्येक कोरोनाच्या रुग्णांना ऑक्सीजन आवश्यक असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले होते.

यासाठी राज्य आरोग्य सचिवांनी प्रत्येक जिल्ह्यांना पत्र लिहीले. त्यानंतर राज्य सरकारने यावर त्वरित निर्णय घेऊन ऑक्सिजनच्या वापरावरील मर्यादा मागे घेतली आहे.

प्रत्येक रूग्णाला “पूर्ण आणि त्वरित ऑक्सिजन मिळायला हवा,” असे आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सोमवारी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

खासगी डॉक्टरांनी जास्त प्रमाणात ऑक्सिजन वापरल्याचे सरकारचे म्हणणे होते. यावर डॉक्टरांनी स्पष्टीकरण दिले की, एखाद्या रुग्णाचा उपचार करताना त्याला अधिक ऑक्सीजन आवश्यक असेल तर, डॉक्टरला रुग्णाला आवश्यक असलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण ठरविण्याचा अधिकार आहे. ऑक्सिजन विषयी केंद्रीय मार्गदर्शक सूचना जारी होईपर्यंत सरकारने रुग्णालयांना ऑक्सिजन अपव्यय कमी करण्यास सांगितले. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सोमवारी नवी दिल्ली येथे ऑक्सिजनचा वापर आणि प्रोटोकॉल तयार करण्यासाठी बैठक आयोजित केली. याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे लवकरच अपेक्षित आहेत.

18 सप्टेंबर रोजी लिहिलेल्या पत्रात व्यास यांनी सामान्य वॉर्डातील कोविड – रूग्णांना प्रति 7 लिटर प्रति मिनिट आणि आयसीयूमध्ये १२ लिटर प्रति मिनिट ऑक्सिजनचा वापर मर्यादित ठेवण्याची शिफारस केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER