कोविडचा उद्रेक : यावर्षी मुंबईत ६४ हजारांपेक्षा जास्त मृत्यू

Corona Virus Death

मुंबई : कोरोनाच्या (Corona) साथीच्या काळात मुंबईत मृत्यूची आकडेवारी २०१९ च्या तुलनेत सुमारे ३७ टक्क्यांनी वाढली आहे. ब्रुहन मुंबई महानगर पालिकेच्या आकडेवारीनुसार यावर्षी १ मार्च ते ३१ जुलै या काळात ४९,०४० मृत्यूची नोंद झाली आहे. याच काळात २०१९ ला ३५,९८२ मृत्यूची नोंद झाली होती. मृत्यूच्या संख्येत १३,०५८ ची वाद झाली आहे.

३१ जुलै पर्यंत कोरोनाच्या ६,३९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत या ५ महिन्यांच्या काळात २०१९ पेक्षा ६,६६३ मृत्यू जास्त झाले आहेत. सर्वात जास्त मृत्यू मे महिन्यात १४,०८५ झाले आहेत. २०१९ ला याच काळात ६,८३२ मृत्यू झाले होते. याबाबतची जून ची आकडेवारी २०२० मध्ये ११,५४० म्हणजे २०१९ पेक्षा ६,७९७ आहे. मृत्यूचे आकडे नोंदण्याची प्रक्रिया अजून सुरु असल्याने या आकडेवारीत आणखी भर पडू शकते.

मार्च २०२० मध्य मुंबईत एकूण ६,६९२ मृत्यूची नोंद झाली. हा आकडा मार्च २०१९ पेक्षा (७,३५८) कमी होता. पण एप्रिल २०२० पासून मृत्यूचा आकडा दर महिन्यात वाढत गेला – एप्रिल ७,२४३ तर मे १४,०८५, जून ११,५४० आणि जुलै ९,४८०.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER