पक्षाघाताचे रुग्ण प्रमाण 1.5 टक्क्यांनी वाढले

मुंबई : कोरोना (Corona virus) साथीच्या काळात नियमित व्यायामाचा अभाव आणि आरोग्याकडे झालेले दुर्लक्ष यामुळे मुंबईत पक्षाघाताचे प्रमाण (paralysis-consequences) वाढले आहे. नानावटी रूग्णालयाने केलेल्या पाहणीत सहा महिन्यांत पक्षाघाताचे रुग्ण 1.5 टक्क्यांनी वाढले आहेत.

नानावटी रूग्णालयातील तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने 1 ऑगस्ट ते 31 ऑक्टोबर दरम्यान रूग्णालयात येणा-या 1500 रूग्णांचा अभ्यास केला. त्यातील 21 रूग्णांना पक्षाघात झाल्याचे समोर आले. रूग्णांपैकी 15 जण कोविड तर 6 जण नॉन कोविड रूग्ण होते. कोविड बाधित रूग्णांना पक्षाघाताचा झटका येण्याचे प्रमाण हे 10 टक्के इतके आहे. काही रुग्णांना लक्षणे जाणवतात मात्र नेमकी माहिती नसते. त्यामुळे पक्षाघाताच्या या 21 रूग्णांपैकी एकाही रूग्णाने वेळेत उपचार घेतले नसल्याचेही स्पष्ट झाले. त्यातही परिस्थिती गंभीर झाल्याने 4 रूग्णांना जीव गमवावा लागला.

सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे पक्षाघात(स्ट्रोक) ला आमंत्रण मिळत आहे. यासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. व्यायामाने पक्षाघाताचा धोका कमी करू शकतो. दररोज 30 मिनिटे व्यायाम करण्याची सवय लावून घेतली आणि जीवनशैली सुधारली तर पक्षाघात टाळता येऊ शकतो. नियमित व्यायामाबरोबरच संतुलित आहार घेणेही आवश्यक आहे. याशिवाय धुम्रपान व मद्यपाना टाळावे. पक्षाघातामुळे जीवघेणे परिणाम सोसावे लागतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER