संघाचा कोविड इव्हेंट : मोहनजी भागवत, प्रेमजी, सुधा मूर्ती करणार समुपदेशन

Maharashtra Today

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटात सापडलेल्या नागरिकांना आत्मबळ मिळावे यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘पॉझिटिव्हिटी अनलिमिटेड’ नावाने एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. टीव्हीवर सादर होणाऱ्या या कर्यक्रमात विप्रोचे अध्यक्ष अजीम प्रेमजी (Azim Premji), इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्ष सुधा मूर्ती (Sudha Murthy) आणि सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) संबोधित करणार आहेत.

हा कार्यक्रम संघाच्या ‘कोविड रिस्पॉन्स टीम’ने  आयोजित केला आहे. चार दिवसांच्या या कार्यक्रमात सद्गुरू जग्गी वासुदेव, श्री श्री रविशंकर, निर्मल संत आखाड्याचे  ज्ञानदेवजी आणि तिरपंथी जैन समाजाचे जैनमुनी प्राणनाथ सहभागी होणार आहेत. प्रत्येक दिवशी दोन व्यक्ती १५ मिनिटे चर्चेत सहभागी होणार आहेत. या संकटाच्या काळात ‘पॉझिटिव्ह’ राहता यावे आणि सर्वांनी एकजूट होऊन कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करावा, यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

आपण लढाई जिंकू शकतो

जनतेचे मनोबल उंचावणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आपण ही लढाई जिंकू शकतो, असा विश्वास लोकांमध्ये निर्माण करायचा आहे, असे संघाच्या कोविड रिस्पॉन्स टीमचे संयोजक निवृत्त लेफ्टनंट जनरल गुरमित सिंग यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button