कोरोनामृत्यू : १० पोलीस कर्मचाऱ्यांची कुटुंबे ५० लाखांच्या नुकसान भरपाईसाठी अपात्र

- काम करताना कोरोना विषाणूंच्या संपर्कात आले नव्हते

मुंबई : कोरोनामुळे (Corona) मृत्यू झालेले १० पोलीस कर्मचारी (त्यांचे कुटुंब) ५० लाख रुपये नुकसान भरपाई मिळण्यासाठी पात्र नाहीत, असे सरकारने म्हटले आहे. या कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला असला तरी कामावर असताना ते कोरोना विषाणूंच्या संपर्कात आले नव्हते, असे याबाबतच्या चौकशीत म्हटले आहे.

याबाबत म्हटले आहे की, कोरोनाच्या साथीच्या सुरुवातीला ज्या पोलिसांना कोरोना झाला ते SARS-CoV-2 विषाणूंच्या संसर्गात आले होते. ज्यामुळे ते कोरोनाच्या विषाणूंना बळी पडले. या संदर्भात उल्लेखनीय आहे की, कोरोनाच्या साथीच्या काळात पोलिसांना कामासाठी प्रोत्साहन देण्यासाठी कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना ५० लाख रुपये नुकसान भरपाई आणि मुलाला पोलिसात नोकरी देण्याची घोषणा केली होती.

याशिवाय मुंबई पोलिसांनी या कुटुंबांना पोलीस कल्याण मदत निधीतून १० लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे की – कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या २४७ पोलीस कर्मचाऱ्यांपैकी ८४ फक्त मुंबईतील आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER