कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी अशी करा नोंदणी

Covid-19 vaccination appointment-How to register for one using the Aarogya Setu app

देशात कोविड – १९ (कोरोना) प्रतिबंधक लसीकरणाची सुरुवात झाली आहे. ज्येष्ठ नागरिक (वय ६० वर्षांपेक्षा जास्त) तसेच रक्तदाब, मधुमेह असे सहआजार असलेल्या ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना लस देण्यात येते आहे.

लसीकरणासाठी कोविन पोर्टल (Cowin portal) किंवा आरोग्य सेतू अ‍ॅप (Aarogya Setu app) वरून नोंदणी करता येईल. आरोग्य सेतू अ‍ॅप वरून नोंदणी अशा प्रकारे करता येईल –

टप्पा १ – iOS किंवा Android स्मार्टफोनवरून आरोग्य अ‍ॅप वर मोबाईल क्रमांकने नोंदणी करता येईल.

टप्पा २ – अ‍ॅप उघडल्यानंतर ‘कोविन’ नावाचा टॅब दिसेल. या पर्यायावर टॅप करा. आपल्याला लसीकरण माहिती, लसीकरण (लॉगिन / नोंदणी), लसीकरण प्रमाणपत्र आणि लसीकरण डॅशबोर्ड असे चार पर्याय दिसतील.

टप्पा ३ – व्हॅक्सिनेशन ऍपवर टॅप करा.

टप्पा ४ – मोबाइल क्रमांकासह नोंदणी करण्यास सांगितले जाईल. एक व्यक्ती त्याच्या मोबाइल नंबरवर चार लाभार्थीं (सदस्यां) साठी नोंदणी करू शकतो. ओटीपी नंबर येईल पुढे जाण्यासाठी तो टाकावा.

टप्पा ५ – नोंदीसाठी नाव, वय, लिंग, जन्मतारीख अशी माहिती भरावी लागेल. यासाठी आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, पेंशन पासबूक, पॅनकार्ड, जॉब कार्ड, मनरेगा कार्ड, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, खासदार, आमदार व एमएलसी यांनी दिलेली अधिकृत ओळखपत्र इत्यादी ओळखपत्र नोंदणीस वैध असतील.

टप्पा ५ – ६० वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्यांना सहआजरां (मधुमेह, रक्तदाब, दमा इत्यादी) ची माहिती द्यावी लागेल यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज आहे. अशा २० आजारांची यादी सरकारने निश्चित केली आहे.

टप्पा ६ – राज्य, जिल्हा, शहर यासाठी पिनकोड आधारित लसीकरण केंद्र निवडण्यास सांगितले जाईल. बर्‍याच तारखा दिसतील, त्यामधून निवड करा.

टप्पा ७ – सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याबद्दल एसएमएस मिळाला पाहिजे. नोंदणीची माहिती जतन करा. अ‍ॅपमध्ये दिलेला आयडी पुरावा सोबत न्या.

ऑनलाईन नोंदणी व्यतिरिक्त ‘वॉक इन रजिस्ट्रेशन’ ची सोयही आहे. थेट रुग्णालयात जाऊनही लस घेता येईल. मात्र, ऑनलाईन नोंदणी किंवा अ‍ॅपद्वारे नोंदणी करणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल, असे कळते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER