राज्यात कोरोनाचे एकूण रुग्ण ११३५, नवे ११७

Maharashtra-Corona virus

मुंबई : महाराष्ट्रात आज कोरोनाचे ११७ नवे रुग्ण आढळलेत. रुग्णांची एकूण संख्या ११३५ झाली असून गेल्या २४ तासांत ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात मुंबईतील ५, पुणे २ आणि कल्याणच्या एकाच समावेश आहे. राज्यात मृतांची एकूण संख्या ७२.

कालचे मृत्यू

सकाळी मुंबई केईएम रुग्णालयात ६४ वर्षांच्या पुरुषाचा मृत्यू झाला. त्याला मधुमेह, उच्च रक्तदाबाचा विकार होता. ४६ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला.ती मधुमेह रुग्ण होती.

६ एप्रिलला रात्री कस्तुरबा रुग्णालयात महिलेचा (८५) मृत्यू. रुग्णाच्या सहवासात होती. दमा आणि फुफ्फुसाचा विकार होता.

आजचे मृत्यू

  • मुंबई केईएम रुग्णालय पुरुष (४४) मृत्यू. मधुमेहाचाही रुग्ण होता.
  • पुणे ससून र्हग्णालयात ५५ वर्षच्या पुरुषाचा मृत्यू.
  • कल्याण – डोंबिवली मनपा ५५ वर्षांच्या महिलेचा बाबू जगजीवनराम रुग्णालयात मृत्यू. फुफुसाचा विकार होता

 

आजपर्यंत चाचणीसाठी पाठवलेल्या २७,०९० नमुन्यातील २५,७५३ निगेटिव्ह आणि ११३५ पॉझेटिव्ह आहेत. ११७ रुग्णांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली. राज्यात ३४,९०४ संशयित रुग्ण घरगुती व ४४४४ संस्थात्मक विलगवासात आहेत.

दिल्लीच्या निजामुद्दीन मशिदीच्या कार्यक्रमात भाग घेणाऱ्याचा शोध घेणे सुरू आहे. त्यांच्यातील २५ जण कोरोनाचे रुग्ण आढळलेत. यातील लातूर – ८, बुलडाणा जिल्हा – ६, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि अहमदनगर येथील प्रत्येकी दोन आणि रत्नागिरी, नागपूर, हिंगोली, जळगाव, वाशीम येथील प्रत्येकी एक जण आहे. राज्यात जिथे कोरोनाच्या रुग्णाचे क्लस्टर आढळले तिथे केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार ‘क्लस्टर कंटेन्मेन्ट कृती योजना सुरू आहे. सध्या मुंबई ६४५, बुलडाणा १९८, वसई-विरार १८३, मीरा-भाइंदर मनपा २००, ठाणे मनपा ३३१ सर्वेक्षण पथके काम करत आहेत. राज्यात एकूण ३६५८ सर्वेक्षण पथके आहेत व त्यांनी १२ लाखांपेक्षा जास्त लोकांचे सर्वेक्षण केले आहे.