वंदे भारत मिशन अंतर्गत येणा-या परदेशींना सात दिवसाचा क्वारन्टाईन अतिरिक्त सात दिवसाचे पैसे परत मिळणार

Quarantine - MHA Quarantine Norms - Foreign Returnees

वंदे भारत मिशन अंतर्गत भारतात परतणा-या प्रवाशांचे क्वारन्टाईनचे अतिरिक्त सात दिवसाचे पैसे हॉटेल्सनी त्वरित परत करावे, अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारच्या राज्यांना सुचना


नवी दिल्ली : वंदे भारत मिशन अंतर्गत परदेशातील भारतीयांना विशेष विमानाने भारतात आणण्यात येत आहे. त्यांच्यासाठी दिलासादायक निर्णय केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाने घेतला आहे. आता परदेशातून आलेल्या भारतीयांसाठी केवळ सात दिवसांचेच संस्थात्मक क्वारन्टाईन असणार आहे. त्यामुळे ज्या प्रवाशांनी 14 दिवसांच्या क्वारन्टाईनसाठी हॉटेल्सला अॅडव्हान्स पेमेंट केलेले आहे. त्यांचे सात दिवसाचे पैसे त्वरित परत करण्यात यावे असे निर्देश केंद्रातील गृहमंत्रालयाने दिले आहे. अंमलबजावणीसाठी तशा सुचनाही राज्य सरकारला केल्या आहेत.

परदेशातून आलेल्यांचा संस्थात्मक क्वारन्टाईन 14 दिवसांवरून सात दिवसांवर केला आहे. पूढचे सात दिवस त्यांना घरी क्वार्नटाईन व्हावे असेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे हॉटेल्सने 14 दिवसांची जी रक्कम ऍडव्हान्स घेतली आहे. त्यापैकी प्रत्येकी सात दिवसांचे पैसे हॉटेल्सकडून परत मिळवण्यासाठी राज्याने पुढाकार घ्यावा असे गृहमंत्रालयाच्या पत्रकात नमुद आहे.

त्यामुळे भारत मिशन अंतर्गत भारतात परत आलेल्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणाचे अतिरिक्त सात दिवसांचे पैसे परत मिळणार आहेत. टाईम्स नाऊने हे वृत्त दिले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER