छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर COVID-19 RT-PCR चाचणी सुरू

Chhatrapati Shivaji Maharaj International Airport - RT-PCR Test

मुंबई : विमानाने बाहेर जाणाऱ्या प्रवाशांसाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर १५ ऑक्टोबरपासून COVID-19 RT-PCR चाचणी सुरु झाली आहे. विमानतळावर प्रवाशांना घेण्यासाठी तसेच निरोप देण्यासाठी विमानतळावर प्रवाशांसोबत येणाऱ्यांही ही चाचणी करता येते.

कोरोनाच्या काळात ही चाचणी ६ सप्टेंबरपासून देशबाहेरून येणाऱ्या प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली होती. त्यानंतर या विमानतळावर येणाऱ्या सर्वच प्रवाशांसाठी सुरु करण्यात आली. या विमानतळावर आतापर्यंत ३३४० प्रवाशाची चाचणी घेण्यात आली आहे. यात २९३० पुरुष आणि ४०० पेक्षा जास्त महिला आहेत. यात फक्त ३८ प्रवासी कोरोना पॉझेटिव्ह निघाले.

आता ही चाचणी विमानतळावरून जाणाऱ्या आणि बाहेरून येणाऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER