देशातील कोरोना रुग्णांची संख्या ४० लाखांच्या पार

Corona

दिल्ली : भारतात कोरोनाच्या (Corona) रुग्णांची संख्या रोज वाढते आहे. देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ४० लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ८६ हजार ४३२ नवीन रुग्ण (86000 New Cases)आढळले. ही आतापर्यंतची सर्वांत मोठी वाढ आहे.

महाराष्ट्रात, दिल्ली, गुजरात, तामिळनाडू, मध्यप्रदेश आणि प. बंगालमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत देशात ८६ हजार ४३२ रुग्ण वाढले आहेत. देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ४० लाख २३ हजार १७९ झाली आहे.

दिलासादायक बाब म्हणजे देशात आतापर्यंत ३१ लाख ७ हजार २२३ रुग्ण बरे झाले आहेत. ८ लाख ४६ हजार ३९५ रुग्णांवर उपचार सुरू आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत १ हजार ८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात ६९ हजार ५६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER