कोविड – १९ ची उत्पत्ती चीनमधूनच! पुण्याच्या दांपत्याचे संशोधन

Maharashtra Today

पुणे : संपूर्ण जगाला संकटात टाकणाऱ्या कोरोनाची उत्पत्ती कुठून झाली याचा शोध घेण्यात जग गुंतले आहे. अनेक संशोधक यासाठी चीनकडे बोट दाखवत आहेत. पुण्यातील वैज्ञानिक दांपत्य डॉ. मोनाली राहलकर आणि डॉ. राहुल बाहुलीकर यांनी, कोरोनाची उत्पत्ती चीनमधूनच झाल्याचे म्हटले( Covid-19 originates from China) आहे.
डॉ. मोनाली आणि डॉ. राहुल यांनी त्यांच्या संशोधनात चीनमध्ये २०१२ मध्ये घडलेला एका घटनेचा संदर्भ दिला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सांगितले की, कोरोनामुळे जगभरात लोकांचे होणारे हाल पाहून करोनाच्या उत्पन्नीचे मूळ शोधण्यासाठी खोलपपर्यंत जाण्याचे ठरवले. कोरोनाशी संलग्न असणाऱ्या इतर व्हायरसचा (RATG13) शोध घेण्याची सुरुवात केली.

मोजियांग येथील खाण आणि ते सहा कर्मचारी

दक्षिण चीनमध्ये मोजियांग येथे वापरात नसलेल्या तांब्याच्या खाणीची काही कागदपत्र त्यांच्या हाती लागली. वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, २०१२ मध्ये सहा कर्मचाऱ्यांना स्वच्छतेसाठी खाणीमध्ये ‘अंडरग्राऊंड’ पाठवण्यात आले होते. या खाणीत मोठ्या संख्येत वटवाघुळांचा संचार होता.

काही दिवसांनी ते सहा कर्मचारी गंभीर आजारी पडले. यावेळी करोना रुग्णांमध्ये दिसणारी ताप, खोकला, रक्ताच्या गुठल्या अशी लक्षणं त्यांच्यात दिसत होती. याशिवाय थकवा, फुफ्फुसातील न्यूमोनिया ही लक्षणंही होती. काही कर्मचाऱ्यांच्या फुफ्फुसातील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाला होता. या सहापैकी तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.

डॉक्टर मोनाली यांच्या म्हणण्यानुसार, “वटवाघूळांच मलमूत्र स्पर्श झाल्यास हवेत मिसळते. त्याच्यावर पाय पडल्यास आसापासच्या वातावरणात पसरते. ज्यामुळे हवा अॅलर्जिक होते आणि तिथे असणाऱ्यांना त्रास होऊ शकतो”.
कोरोनाच्या जगभरातील रुग्णांचे रेडिओलॉजिकल रिपोर्ट पाहिले असता मोजियांगमधील खाण कामगारांशी ते जुळत असल्याचे लक्षात येते. सीटी स्कॅनलमध्येही हे साधर्म्य दिसते. मे २०२० मध्ये आम्ही यासंबंधी पेपर प्रसिद्ध केला होता. यानंतर ‘TheSeeker’ या ट्विटर युजरने आमच्याशी संपर्क साधला. त्यानेही शोध घेतला असता याच गोष्टी त्याला आढळल्या होत्या. मोजियांगच्या खाणीमधील कामगारांना जाणवणाऱ्या लक्षणांची माहिती असणारा प्रबंध त्याने आमच्यासोबत शेअर केला होता.

डॉक्टर मोनाली आणि डॉक्टर राहुल यांनी ‘करोना डॉक्टर ऑफ चायना’ म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर झाँग यांचाही उल्लेख केला आहे. व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून खाणीतील सहा कर्मचाऱ्यांच्या केसचा अभ्यास केल्यानंतर व्हायरल संक्रमणमुळेच त्यांची ही स्थिती झाली होती, असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button